मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सोयाबीन तापलंय

सोयाबीन ८०००-८५००/Qtl (८०-८५Rs/kg)  सोयाबीन बियाणे १२०-१८०Rs./kg अचानक खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन मध्ये एवढी तेजी , बाजारामध्ये सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा, सोयाबीन सह सर्वच खाद्यतेलाच्या किमतींमध्ये ५०%हुन अधिक वाढ. हे अचानक एका महिन्यात झालेल्या बदलांमुळे सोयाबीन च्या पेरण्या आणि त्याच्याशी निगडित उद्योगधंदे प्रभावित झाले आहेत.  ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर असोसिएशन चे अध्यक्ष श्री. बहादूर अली यांनी केंद्रीय मंत्री पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय श्री गिरीराज सिंग यांना दिलेल्या पत्रामध्ये  सोयाबीन च्या वाढत्या दरामुळे पोल्ट्री , दुभते पशुधन आणि डुक्करपालन अश्या व्यवसायांवर आलेल्या वाईट परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. . वाढते वाहतूक खर्च , महामारीचे सावट यामध्ये गेल्यावर्षी पोल्ट्री व्यवसायाला खूपच मार बसला होता. एक कोंबडी १०Rs च्या दरावर आली होती. आता काही प्रमाणात सुधारत असलेली परिस्थिती पुन्हा  या सोयाबीन च्या दुप्पट झालेल्या दरांमुळे डबघाईला जात आहे. सोयाबीन हे पशुधन खाद्य मध्ये एक कॉमन आणि उत्त्तम प्रोटीन सोर्स आहे. त्याचे दर भारताबाहेर जवळपास निम्म्या किमत...

पत्रास कारण कि,

प्रति, स्वच्छ पुणेकर, मु.पो- सुंदर पुणे ता.-निरोगी पुणे जि. स्वच्छ भारत प्रिय पुणेकर, कसे आहात ? स्वच्छतेचे धडे नीट गिरवताय ना ? हे धडे आपल्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत हि गिरवत आहे. जरी आज आम्ही पुणेकरांसाठी पत्र लिहीत असलो तरी ते पुणेकरांनी इतर सर्व शहरांना हि पोहोचवावे हि विनंती. विनंती पत्राच्या सुरवातीलाच करत आहोत कारण आमचा प्रश्न फक्त पुण्याला नाही तर तो सर्वांसाठीच आहे. तुम्हाला आमची कमतरता जाणवत असेल, आणि जिथे आम्ही उपस्थित असू हि तिथे आमची अवस्था बघून तुम्हालाही वाईट वाटत असेल. म्हणून आम्ही पुणे शहरातील सर्व सार्वजनिक प्रसाधन गृहे(मुताऱ्या) ,शौचालये एकत्र येऊन आपणास पत्र लिहीत आहोत. पत्रास कारण कि,असलेली आमची संख्या , असलेल्या कोणत्याही प्रसाधन गृहाचे झालेले हाल , तिथली स्वच्छता हि फारच दुय्यम दर्जाची होत चालली आहे. किंबहुना ती दुय्यमच राहिली आहे. तुम्ही फिरायला, कामाला किंवा अगदी सहजच जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुम्हाला कधी हि कोठेही "नैसर्गिक कॉल" येत असेलच त्यावेळी तुम्हाला आमची आठवण नक्की येत असेल. तुम्ही आमच्या शोधात सैर-भैर होऊन फिरता. नशिबाने आम्ह...

पत्रास कारण कि,

प्रति, भरधाव पुणेकर, मु.पो.वाऱ्यावर तालुका. वेगाच्या मागे. जिल्हा.वेळच्या पुढे. प्रिय पुणेकर, नमस्कार सादर प्रणाम. आजच्या धावपळीच्या आणि वेगवान दळणवळणाच्या युगात आम्ही रोजच्या तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चाललो आहेत. परंतु प्रत्येक वेळी तुमच्या अपशब्दांचे धनी बनत असतो. कदाचितच कधी आजपर्यंत आमच्यासाठी कोणी चांगले शब्द पण काढत असेल. आज वेग हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. ज्याचा वेग मंदावला तो स्पर्धेतून मागे पडला हे अगदी सर्वश्रुत आहे आणि इथेच आमचा प्रवेश होतो. आम्ही पुण्याच्या सर्व रस्त्यांवरील पुणेकरांच्या वेगाला कमी करणारे गतिरोधक आहोत. खरंच आम्ही गतिरोधक म्हणजे आजच्या मराठीत स्पीड ब्रेकर आहोत. आमच्या नावे बोटे मोडताना आपण आमचे अस्तित्व विसरू नयेत म्हणून आज सर्वानी मिळून तुम्हाला चार शब्द लिहायचे ठरवले आहे. आणि म्हणूनच हे पत्र लिहायला घेत आहोत. कदाचित गतिरोधक हा शब्द सुद्धा ऐकायला जड जात असेल ना ? इथून पुढे आजच्या बोलीभाषेतील  स्पीड ब्रेकर हा शब्द पुढच्या पूर्ण पात्रात आम्ही वापरात आहोत म्हणजे कदाचित आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचतील. पत्रास कारण कि, जीवनाचा वाढ...

तू चाल पुढं....

येड्यांची जत्रा. चित्रपट क्षेत्र असो किंवा नाटक अस्पृश्य विषयांना पहिलस्पर्श करण्याची हिम्मत जर कोणाची असेल तर ती मराठीचाच असावा असा माझा दावा नाही पण हे खोत हि नाही. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये हिंदी च्या आधीच समांतर सिनेमा हा तद्दन व्यावसायिक सिनेमाच्या पुढे सरकला होता. व्यावसायिक चित्रपटांनी हि कधी हि त्यांची मर्यादा ओलांडल्या नाहीत आणि समांतर सिनेमांनी त्यांचे काम सोडले नाही. आजच्या परिस्थितीमध्ये समांतर आणि व्यावसायिक असा भेद मराठी सिनेमांमध्ये राहिलाच नाही. येड्यांची जत्रा हा चित्रपट २०१२ मधील आहे. याच वर्षी राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाबू बॅंड बाजा, काकस्पर्श, तुकाराम, पिपाणी, बालक पालक आणि शाळा सारखे सुंदर आणि यशस्वी मराठी चित्रपट आले. महेश मांजरेकर, गजेंद्र अहिर सारखे दिग्दर्शक , रितेश देशमुख सारखा लोकप्रिय कलाकार हे मराठी चित्रपट सृष्टीकडे २०१२ पर्यंत पूर्णपणे वळले होते. मराठी सिनेमाकडे पडणारी पावले वाढली होती. त्या वेळेतील येड्यांची जत्रा हा टिपिकल मराठी मनोरंजन करणारा सिनेमा आला होता. बऱ्याच जणांनी पहिला असेल परंतु ज्यांनी नसेलच पहिला त्यांच्यासाठी टॉयलेट एक प्रेम कथा सा...

पत्रास कारण कि,

प्रति, प्रवासी पुणेकर. मु.पो. दरवाज्यात. तालुका : गर्दीच्या रांगेत. जिल्हा : मिळेल त्या शीटवर प्रिया पुणेकर रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सोबत आम्ही रोजच्या रोज न थकता आपल्या सेवेत असतो. रोजच्या गर्दीत आम्ही तुमच्याशी काही बोलावे असे नेहमी वाटत असते परंतु ते काही शक्य होत नाही. म्हणून आज पत्र लिहून आपल्याशी चार गोष्टी करत आहे. पत्रास कारण कि, नवीन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आमची चुलत बहीण मेट्रो आता आपल्या सेवेत येत आहे. तेव्हा आमच्याकडे फारसे लक्ष दिले जाईल असे वाटत नाही. म्हणून तुम्ही पूर्णच विसरून जाण्याआधी काही आठवणी आणि अडचणी आपणास सांगण्यासाठी आम्ही सर्व जणी मिळून हे पत्र लिहीत आहोत. १९४० पासून पुणे शहराच्या सेवेत आम्ही वेगवेगळ्या नावाने कार्यरत आहोत. त्यापैकी पी एम टी नाव आपल्या सर्वांच्या ओळखीचे आणि जिव्हाळ्याचे असावे. पहाटे ५.३० पासून रात्री १२ वाजे पर्यंत आम्ही तुमच्या सेवेत धावत असतो. कोणी कामावर जात असते , कोणी शाळा कॉलेजात , कोणी पाहुण्यांकडे तर कोणी खरेदीसाठी जाण्यासाठी निघतात, तेव्हा तुम्हाला वेळेवर आणि सुखरूप पोहचवण्या साठी आम्ही सदैव तत्पर असतो.वेळेप्रमाणे आम...

पत्रास कारण कि,

प्रति, पुणेकर मैदानवाले. मु.पो.कधीतरी मैदानावर. तालुका: मैदानाच्या बेंचवर जिल्हा : मैदानाच्या कोपऱ्यावर. प्रिया पुणेकर, आजकाल आपली वाढती गर्दी पाहून आम्हा सर्व मैदानांचा उर अगदी भरून येतो.आम्हालाही मैदान म्हणून मिरवायला हुरूप येतो. तुम्ही येतच असतात तर म्हंटल चला आज तुमच्याशी दोन शब्द बोलूच. पण तुमच्या कानात आजकाल स्वतःचाच आवाज घुमवणारी बोळे लागलेली असतात त्यामुळे आमचा आवाज काही पोहचायलाच तयार नाही. म्हणून आम्ही सर्वानी एकत्र येऊन पत्र लिहायचं ठरवलं. पत्रास कारण कि, आपली शहरे दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगत होत आहेत. वाहतुकीची नवी साधने वाढत आहेत. परंतु या वाढत्या सुविधांमध्ये आम्हा मैदानांचा गळा आवळला जातोय. मैदानाचे बगीचे होत चाललेत. पायामध्ये माती पेक्षा कृत्रिम गवत वाढू लागले आहे. शहरातील प्रगती ज्या वेगाने पुढे पाऊले टाकत आहे त्या वेगाने मैदाने आकुंचन पावत आहेत. तुम्ही म्हणाल कि उभ्या राहणाऱ्या प्रत्येक इमारती सोबत प्ले ग्राऊंड्स पण बांधली जातात, "अमेनिटीज " मध्ये असतात. मग तुम्ही मैदाने का ओरडतायत ? पुणेकरणांनो, मैदाने आणि अमेनिटीज मध्ये धोनी आणि विराट एवढा  फरक...

पत्रास कारण कि,

प्रति, श्री.पुणेकर ट्रॅफिकवाले. मु.पो.गाडीवर तालुका-चालू गाडीवर जिल्हा-हॉर्नपूर. प्रिय पुणेकर, नमस्कार, सादर प्रणाम !.मी लालबत्ती सिग्नलवाली. बऱ्याच दिवसांपासून तुमच्या सर्वांशी बोलायचं होत. आज मराठी राजभाषा दिनाच्या शुभ मुहूर्तावर पत्र लिहायला घेत आहे. जे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्यापर्यंत पोहचेल अशी अपेक्षा करते आणि मुख्य विषयाकडे वळते. पत्रास कारण कि , सततचा होणार अपमान आता मला सहन होत नाही. आपल्या पुण्याचा चौका चौकात मी  दिवसभर भर उन्हात आपल्या सर्वासाठी जळत उभी असते परंतु माझ्या अस्तित्वाला नेहमी पुणेरी टोमणा मारल्या सारखे बरेचशे पुणेकर न जुमानता निघून जातात. माझी शेजारीण पिवळी बत्ती आपल्याला नेहमी माझ्या येण्याची आठवण करून देत असते आणि आपणास वेग कमी करण्यास सुचवत असते. परंतु आपण शेवटी पुणेकरच ना गाडीच्या भोंग्याचा आवाज वाढवत, मला धुडकावून लावत. आपण उलट अजूनच वेगाने निघून जाता. शेवटी माझ्या इज्जतीचे रक्षण करण्यासाठी उभे असलेले आमचे पोलीस बंधू पाहून तुम्ही कसे बसे थांबता. मी हे सर्व वरून पाहत असते. थांबल्यावर हि आपले वाहन बंद न करता भोंग्यावर हाताचे वजन वाढवून मला घाबरवत...