मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Marathi लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्वप्ने साजरी करा ....

मला असं वाटतंय .... मला, तुम्हाला आणि आपण सर्वाना खूप काही वाटत असतं . कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेता व्हायचंय,कोणाला नेता व्हायचंय , कोणाला कलाकार तर कोणाला उद्योजक व्हायचंय. हे वाटणं काही चुकीचं नाही. कारण काही तरी वाटल्याशिवाय काही तरी बनता पण येत नाही. सर्वच जण अपघाताने किंवा नशिबाने आयुष्याच्या उत्तुंग शिखरावर नक्कीच पोहचत नाहीत. काही तरी, कोणी तरी बनण्याची उर्मीच आपल्याला त्या शिखरापर्यंत घेऊन जात असते. मला वाटतं कि मी मुख्यमंत्री व्हावं , महाराष्ट्राचं भलं करावं , भ्रष्टाचार मोडून काढावा , राजकारण शुद्ध करावं , शहरांचा विकास करावा. पण हे वाटणं तुमच्या माझ्या सत्य परिस्थितीबद्दल काहीच बोलत नाही. जे बोललं जात ते भविष्याबद्दल , जे अजून घडायचं आहे. सोबतच हे वाटत असताना मी एक सामान्य नागरिक आहे, रोज महागतलं पेट्रोल डिझेल साठी रांगेत उभा असतो, निवडणुका आल्या कि रोजच्या जीवनातल्या अडचणी सोडून भलत्याच गोष्टींना बळी पडून , चार पैसे घेऊन , मान मोडलेला , स्वाभिमान मेलेला क्षुद्र मतदार आहे. ज्याला निवडणुकी नंतर काडीची किंमत नाही हे विसरून जातो. घर , गाडी चे हप्ते , टॅक्स चे हप्ते देऊन कं...

कृषाग्रलेख : कापूसगोष्टी (संकरित संक्रमण) 2.

"दोन वर्षात महाराष्ट्राला अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही केल्यास मी वसंतराव फुलसिंग नाईक भर चौकात फासावर जाईन,"असा वायदा करून कायम सूट बुटात असणारा हातात पाईप असलेला देखणा मुख्यमंत्री त्याच सुटाबुटात कोणत्याही सोशल मीडिया च्या हव्यासाविना १९६० च्या दशकात शेतकऱ्याच्या शेतात जाऊन हातात खुरपी घेऊन तण काढू लागला. एकीकडे दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान एक वेळचे अन्नत्याग करून जय जवान जय किसान घोषणा देत होते तर एकीकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आधुनिक शेतीचा मंत्र देत होते. भारतरत्न डॉ.स्वामिनाथन यांनी हरितक्रांतीची पेटवलेली मशाल महाराष्ट्राच्या गावागावात तेवत ठेवण्याचे काम हरित क्रांतीचे प्रणेते मा.मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी केले. हे ऐकायला किंवा वाचायला जरी सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते किती क्रांतिकारक होते हे आज पिझ्झाचे तुकडे तोडताना आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही. कधी घरातल्या थोरा-मोठ्यांकडून डुकरांचे खाद्य असलेल्या लाल गव्हाच्या गोष्टी ऐकल्यावर कशी माणसे हि जनावरांच्या ताटात खात होती  याचे भळभळते अंजन आपल्या ड...

चिलीच्या किवी आणि भारत.

जगाच्या बाजारात चिली हा देश किवी उत्पादनात पहिल्या पाच देशांमध्ये येतो. चीन,इटली,न्यू झीलंड सारख्या देशानंतर चिलीचा क्रमांक लागतो.   भारतातील किवी फळाचा वाढता खप बघून चिली हा देश भारतामध्ये किवीच्या खपासाठी खास अभियान राबवणार आहे. ज्या मध्ये किवी फळाचे आरोग्यासाठी चे फायदे सांगितले जातील आणि लोकांमध्ये त्यासंबंधीची जन जागृती होईल. हे सर्व करताना चिली या देशाचे मुख्य उद्दिष्ट हे भारतामधील किवी निर्यात दुप्पट करणे हे आहे. आपल्या आरोग्याचे फायदे समजावून घेताना चिली देशातील शेतकऱ्यांचा होणारा फायदा त्यांना मिळणारे अधिकचे दर हे पाहणे विसरून चालणार नाही. चिली सारख्या छोट्याश्या देशाने अश्या प्रकारे त्यांचा देशातील शेतकऱ्यांसाठी कल्पक अभियान राबविणे हि बाब अभिनंदनीय आहे. भारतासारख्या फळ-फळावलीच्या देशामध्ये सीताफळ, रामफळ, हनुमानफळ,करवंदे,आंबट बोर,फणस  यांसारख्या अनेक फळांनी समृद्ध देशामध्ये येणाऱ्या कोणत्याही सरकारने द्राक्षे, संत्रे,आंबा यापलीकडे जाऊन भारतीय शेतकऱ्यांसाठी कोणत्याही देशामध्ये असे काही प्रकार केलेले नोंद कदाचित नसावीच. जर अश्या प्रकारे आपल्या मूळच्या फळांना...