प्रवासात काही ठिकाणं आपण शोधतो…
आणि काही ठिकाणं आपल्याला शोधून काढतात. Szimpla Kert असंच एक ठिकाण आहे — जगातील Top 3 Ruin Bars पैकी एक
हंगेरी – बुडापेस्टच्या प्रवासात असंच एक नाव अचानक कानावर पडलं – Szimpla Kert. Local Free Guide Tour दरम्यान सहज बोलताना गाईडने या जागेचा उल्लेख केला आणि त्याबद्दलची एक अनोखी गोष्ट सांगितली. त्या क्षणी काही विशेष वाटलं नाही, पण ते नाव मनात कुठेतरी खोलवर रुतून बसलं.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी dinner साठी कुठे जायचं यावर चर्चा सुरू झाली. अनेक पर्याय होते, पण नकळत Szimpla Kert चं नाव पुढे आलं. Google वर फक्त location पाहिली होती; त्या जागेचा अनुभव, vibe किंवा atmosphere याबद्दल आम्ही पूर्णपणे अनभिज्ञ होतो.
बुडापेस्टमध्ये हिवाळ्यात सूर्य लवकर मावळतो. चार वाजताच अंधार पडलेला. पाच-सहा वाजता कडाक्याच्या थंडीत बस शोधत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. बाहेरून पाहिलं तर रस्ता शांत, मोकळा आणि जवळजवळ निर्मनुष्य. फक्त ३–४ लोक बाहेर उभे. क्षणभर वाटलं – “आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही ना?”
पण प्रवासात कधी कधी शंका ओलांडली कीच खरा अनुभव मिळतो.
हिम्मत करून मी, पियू आणि माझी बहीण अनुजा आत शिरलो…
आणि पुढच्याच क्षणी जाणवलं – आपण एका वेगळ्याच जगात प्रवेश केला आहे.
बाहेरचा अंधार, आतली जिवंत दुनिया
बाहेर शांतता होती, आत मात्र जिवंतपणाने भरलेली गर्दी. तोही weekday असूनसुद्धा. Szimpla Kert मध्ये प्रवेश करताच सगळ्यात आधी जाणवते ती – कोणत्याही चौकटीचा अभाव.
इथे:
-
waiter तुमच्यासाठी धावपळ करत नाही
-
host तुम्हाला table पर्यंत घेऊन जात नाही
-
एकसारख्या खुर्च्या, टेबल्स किंवा seating plan नाही
-
लख्ख उजेड नाही की सगळं स्पष्ट दिसेल
जिथे जागा मिळेल, तिथे बसा. जी खुर्ची मिळेल, ती वापरा. लाल, निळ्या, हिरव्या, काळ्या रंगांचा अनियमित संगम. अंधुक प्रकाशात डोळ्यांना हवाहवासा वाटणारा गोंधळ.
भिंतींवर रंगीत चित्रं, जुनी posters, अजब कलाकृती. काहीही ठरलेलं नाही, काहीही नियमबद्ध नाही. २–३ मजली जुनी, मोडकळीस आलेली चाळ जणू… पण त्याच अवस्थेत तिला एका जागतिक दर्जाच्या बारमध्ये रूपांतरित केलं आहे.
Szimpla Kert हा बुडापेस्टमधील पहिला आणि सर्वात प्रसिद्ध Ruin Bar मानला जातो. 2002 साली एका जुन्या, वापरात नसलेल्या इमारतीत “जशी जागा आहे तशीच वापरायची” या विचारातून हा बार सुरू झाला.
आज Szimpla Kert चा समावेश जगातील अनेक आंतरराष्ट्रीय rankings मध्ये Top 3 Bars in the World मध्ये होतो. “Szimpla Kert” चा शब्दशः अर्थच आहे – Simple Garden – पण अनुभव मात्र अजिबात साधा नाही.
इथे लोक नाहीत, इथे अनुभव आहेत
जुन्या अवशेषांसारख्या वातावरणात गजबजलेला हा बार फक्त drink किंवा food साठी नाही. तो माणसांसाठी आहे.
कुठे मोडका bathtub seating म्हणून वापरलेला. कुठे एखादा stool वर बसून स्वतःमध्ये हरवलेला माणूस. Young, old, male, female – सगळ्या वयोगटांचा आणि संस्कृतींचा संगम.
२–३ वेगवेगळ्या ठिकाणी drinks counter सापडतात. एका कोपऱ्यात छोटंसं food counter – ठराविक menu, तेही स्थानिक food culture जपणारं.
इथे कोणी judge करत नाही.
कोणी नियम सांगत नाही.
कोणी तुमचं मोजमाप करत नाही.
फक्त एक गोष्ट नकळत सांगितली जाते –
“जसे आहात तसे रहा, आणि मनमोकळेपणाने enjoy करा.”
माझ्यासाठी हा अनुभव का खास ठरला?
पुणे–मुंबईत अनेक वेगवेगळे cafes, bars आणि hotels पाहिले आहेत. पुण्यातील NIPR थोडा जवळ जाणारा अनुभव देतो, पण तरीही Szimpla Kert ची vibe काहीतरी वेगळीच होती.
तिथे काय खाल्लं, काय पिलं – हे महत्त्वाचं नव्हतं.
महत्त्वाचं होतं – तिथे बसून तो माहोल अनुभवणं.
२–३ तास नकळत निघून गेले. मन dopamine च्या धबधब्यात न्हाऊन निघालं. आणि बाहेर पडताना पहिल्यांदाच असं वाटलं की आपण एका अलिखित स्वातंत्र्याला स्पर्श करून आलो आहोत.
Szimpla Kert माझ्यासाठी फक्त बुडापेस्टमधला bar नाही.
तो एक अनुभव आहे.
एक विचार आहे.
आणि प्रवासात क्वचितच मिळणारी – स्वतःला विसरून जगण्याची संधी आहे.
जगातला नंबर १ bar म्हणा, बुडापेस्टचं सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणा – माझ्यासाठी Szimpla Kert हा आजपर्यंतच्या प्रवासातला सर्वात संस्मरणीय अनुभव ठरला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा