मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

cotton लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कृषाग्रलेख : कापूसगोष्टी (संकरित संक्रमण) 2.

"दोन वर्षात महाराष्ट्राला अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही केल्यास मी वसंतराव फुलसिंग नाईक भर चौकात फासावर जाईन,"असा वायदा करून कायम सूट बुटात असणारा हातात पाईप असलेला देखणा मुख्यमंत्री त्याच सुटाबुटात कोणत्याही सोशल मीडिया च्या हव्यासाविना १९६० च्या दशकात शेतकऱ्याच्या शेतात जाऊन हातात खुरपी घेऊन तण काढू लागला. एकीकडे दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान एक वेळचे अन्नत्याग करून जय जवान जय किसान घोषणा देत होते तर एकीकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आधुनिक शेतीचा मंत्र देत होते. भारतरत्न डॉ.स्वामिनाथन यांनी हरितक्रांतीची पेटवलेली मशाल महाराष्ट्राच्या गावागावात तेवत ठेवण्याचे काम हरित क्रांतीचे प्रणेते मा.मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी केले. हे ऐकायला किंवा वाचायला जरी सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते किती क्रांतिकारक होते हे आज पिझ्झाचे तुकडे तोडताना आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही. कधी घरातल्या थोरा-मोठ्यांकडून डुकरांचे खाद्य असलेल्या लाल गव्हाच्या गोष्टी ऐकल्यावर कशी माणसे हि जनावरांच्या ताटात खात होती  याचे भळभळते अंजन आपल्या ड...

कृषाग्रलेख : कापूसगोष्टी १ .

" कापूस " हा शब्द आणि पदार्थ बहुतेकांच्या जीवनात तेवढासा महत्वाचा नसेल. समईतील वात बनवण्यासाठी, कधी लागलं खुपलं तर , इंजेक्शन देताना वगैरे किंवा जखमेवर लावलेला , जुन्या उश्या गाद्यांमधून बाहेर आलेला कापूस. फार फार तर अत्तर लावून कानात कोंबून ठेवलेला आणि मयताच्या नाकात ठेवलेला कापूस . तो  कापूस  बनतो कुठे , कसा बनतो ह्यावर कधी आपण गांभीर्याने विचारच करत नाही.  कापूस  लागला तर तो घरात असतोच. एवढं काही महत्वाचा किंवा त्याच्या शिवाय घर चालू शकतच नाही अशी काही त्याची ख्याती अजून तरी नाही.तेव्हा थोडी कापसाची ओळख करून घेऊयात. इंग्रजांनी १५० वर्षे भारताला पिळून काढले त्यात सर्वात महत्वाचे कारण होते कापूस . फुटबॉल प्रेमींची ओळखीची नावे असणारे लिव्हरपूल , मँचेस्टर किंवा लँकेशायर हि शहरे ज्यावर उभी राहिली तो म्हणजे कापूस . जगात पहिली औद्योगिक क्रांती झाली त्याचा कच्चा माल म्हणजे कापूस . अमेरिकेत शेतातील मजूरकामासाठी आफ्रिकेतून काळ्यालोकांचा व्यापार चालू केला गेला त्याचे कारण कापूस . आज खनिज तेलाने जागतिक राजकारणात ज्याला हटवून आपले केंद्रस्थान बनविले आहे त...