मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कविता लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्वप्ने साजरी करा ....

मला असं वाटतंय .... मला, तुम्हाला आणि आपण सर्वाना खूप काही वाटत असतं . कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेता व्हायचंय,कोणाला नेता व्हायचंय , कोणाला कलाकार तर कोणाला उद्योजक व्हायचंय. हे वाटणं काही चुकीचं नाही. कारण काही तरी वाटल्याशिवाय काही तरी बनता पण येत नाही. सर्वच जण अपघाताने किंवा नशिबाने आयुष्याच्या उत्तुंग शिखरावर नक्कीच पोहचत नाहीत. काही तरी, कोणी तरी बनण्याची उर्मीच आपल्याला त्या शिखरापर्यंत घेऊन जात असते. मला वाटतं कि मी मुख्यमंत्री व्हावं , महाराष्ट्राचं भलं करावं , भ्रष्टाचार मोडून काढावा , राजकारण शुद्ध करावं , शहरांचा विकास करावा. पण हे वाटणं तुमच्या माझ्या सत्य परिस्थितीबद्दल काहीच बोलत नाही. जे बोललं जात ते भविष्याबद्दल , जे अजून घडायचं आहे. सोबतच हे वाटत असताना मी एक सामान्य नागरिक आहे, रोज महागतलं पेट्रोल डिझेल साठी रांगेत उभा असतो, निवडणुका आल्या कि रोजच्या जीवनातल्या अडचणी सोडून भलत्याच गोष्टींना बळी पडून , चार पैसे घेऊन , मान मोडलेला , स्वाभिमान मेलेला क्षुद्र मतदार आहे. ज्याला निवडणुकी नंतर काडीची किंमत नाही हे विसरून जातो. घर , गाडी चे हप्ते , टॅक्स चे हप्ते देऊन कं...

काय बदलले ...?

काय बदलले , काय बदलले ? रंग ना हलले रूप बदलले  खाणाऱ्यांचे मार्ग बदलले. वेळेवरती बाप बदलले जखमेवरचे मीठ बदलले. काय बदलले काय बदलले ? टोचणारे काटे बदलले चकवणारे फाटे बदलले, वाट्याचे वाटे बदलले, होणारे घाटे बदलले. काय बदलले, काय बदलले ? मर्दानगीचे नियम बदलले, देशभक्तीचे नाव बदलले खरे खोट्यात बदलले आणि खोटे नाहीच बदलले. काय बदलले काय बदलले ? लोकांचे ग्रह बदलले, ग्रहांचे तारे बदलले, शब्दांचे वापर बदलले, स्वतः शब्द पण बदलले. काय बदलले काय बदलले ? फेसबुकचे फायदे बदलले, ट्विटर चे तोटे बदलले,  व्हाट्सअपने सत्य बदलले, टीव्हीने तर आपले धंदे बदलले. काय बदलले काय बदलले ? देवांचे काम बदलले, बोलणाऱ्यांचे राम बदलले, महापुरुषांचे मान बदलले, दानपेटीमधले दान बदलले.  काय बदलले काय बदलले ? शेतीचे प्रश्न बदलले ? उत्तरांचे स्वर बदलले, शेतावरच चोर बदलले,  आणि फासावरचे दोर बदलले. काय बदलले काय बदलले ? बुद्धिबळातले प्यादे बदलले, लावायचे घोडे बदलले, पुस्तकातले धडे बदलले, आणि लोकशाहीचे खांबच बदलले. - स्वरराज.

माणसातली माकडं ...!

माकडातली माणसं स्वतःला हुशार समजायला लागली,पोटाच्या प्रश्नावर पर्याय शोधू लागली , दुसऱ्याचं ओढून स्वतः खाऊ लागली, कोणी मांस तर कोणी घास खाऊ लागली, भीती जनावरांची नाही रे, माणसांची वाटू लागली, वाटून खायची रोटी आता हिसकावून खाऊ लागली, उगवणारे किती अन ओरबाडणारे  किती अशी चर्चा चालू झाली, तिथूनच लुबाडणारी व्यवस्था आपल्याकामी लागली.. व्यवस्था अवस्थेला  नावं ठेऊ लागली, ती  नावं  नकळतच आडनावं  बनू लागली, नावं अडकित्यात जिथून सापडू लागली, तिथूनच जातींची  खांडं खडखडा पडू लागली. खांडं गोळा करून जी सुपारी विकायला लागली, लोकं त्यांना दलाल म्हणू लागली, दलालीच्या अजगरावर ज्या गरुडाची झडप पडली, त्याला लोकं बळीराजा म्हणू लागली. प्रजेला राजाची सवय पडू लागली, मातीतल्या घामावर बळी राज्य करू लागली, बघवले ना यज्ञाला , पाण्याची भीती वाटू लागली, तिथूनच संघर्षाची गोल शिट्टी  वाजू लागली. शिट्टी त्यांनी आधीच ऐकली तरी आम्ही अजूनहि नाही ऐकली, लोकं पाहून आंधळे,बोलून मुके आणि  ऐकून बहिरी  बनू लागली, देवांची दुकानं जम धरू लागली , तिथूनच भीतीच्या भक्तीला कि...

सुपर हिट चित्रपट

सध्या चालू एक चित्रपट आहे. ज्या मध्ये मोठमोठे अभिनेते आहेत. काही तल्मितले तर काही मॅटवरचे आहेत, काही नवीन तर काही जबरदस्तीचे पन आहेत आणि काही, हे का आहेत ? असे  हि आहेत. ह्या मध्ये खूप ड्रामे आहेत. अगदी वास्को द गामापर्यंतच्या कहाण्या आहेत, इतके टर्न आणि ट्विस्ट आहेत कि गामा पासून रामापर्यंतचे पुरावे आहेत. ह्या यामध्ये मनोमिलन, घरवापसी,फुटला, बोलला, गेला आणि हाणला सारखे इमोशन्स आहेत. कर्जमाफी, शेतकरी, स्थानिक उद्योगधंदे,छोटे उद्योजक, डिजिटल जनता अशी मेड इन इंडिया ट्रॅजेडी आहे. अक्शन सध्या सुरु आहे, त्यातून बाहेर पडलात कि हसवायला १ महिना सभांची कॉमेडी आहे. सेन्सॉरच तर बंधनच नाही. नुकत्याच जन्मलेल्या बाळा पासून ते नुकत्याच गेलेल्या जीव पर्यंत सर्वांना अनिवार्यच आहे. तोफांची नावं बदलतील, मैदाने तिच राहतील .कितीही देव बदलतील पण भोग तेच राहतील अशी गोष्ट आहे. नायक कोण अन खलनायक कोण हे त्यांनीच ठरवायचं आहे, कारण स्क्रिप्ट मध्ये नाक खुपसण्यास सक्त मनाई आहे. गाणे नसतील तरी घोषणा मन रमवून ठेवतील , स्वातंत्र्य दिन नसला तरी देशभक्तीचे गीत चालू असतील. प्रोड्युसर पडद्याम...