माकडातली माणसं स्वतःला हुशार समजायला लागली,पोटाच्या प्रश्नावर पर्याय शोधू लागली ,
दुसऱ्याचं ओढून स्वतः खाऊ लागली, कोणी मांस तर कोणी घास खाऊ लागली,
भीती जनावरांची नाही रे, माणसांची वाटू लागली, वाटून खायची रोटी आता हिसकावून खाऊ लागली,
उगवणारे किती अन ओरबाडणारे किती अशी चर्चा चालू झाली, तिथूनच लुबाडणारी व्यवस्था आपल्याकामी लागली..
व्यवस्था अवस्थेला नावं ठेऊ लागली, ती नावं नकळतच आडनावं बनू लागली,
नावं अडकित्यात जिथून सापडू लागली, तिथूनच जातींची खांडं खडखडा पडू लागली.
खांडं गोळा करून जी सुपारी विकायला लागली, लोकं त्यांना दलाल म्हणू लागली,
दलालीच्या अजगरावर ज्या गरुडाची झडप पडली, त्याला लोकं बळीराजा म्हणू लागली.
प्रजेला राजाची सवय पडू लागली, मातीतल्या घामावर बळी राज्य करू लागली,
बघवले ना यज्ञाला , पाण्याची भीती वाटू लागली, तिथूनच संघर्षाची गोल शिट्टी वाजू लागली.
शिट्टी त्यांनी आधीच ऐकली तरी आम्ही अजूनहि नाही ऐकली, लोकं पाहून आंधळे,बोलून मुके आणि ऐकून बहिरी बनू लागली,
देवांची दुकानं जम धरू लागली , तिथूनच भीतीच्या भक्तीला किंमत मिळू लागली.
जस जशी वेळ पुढं सरकू लागली, भक्ती आणि शक्ती ची गाठ पडू लागली,
भक्ती चा विद्रोह संत घडवू लागली, आणि लोकंहि शक्तीला छत्रपती म्हणू लागली.
फाटलेल्या वादळाला लोकं दुरून हसू लागली, आता शक्तीची वाट दिशाहीन होऊ लागली,
लोकं भक्तीच्या अर्थाचा अनर्थ घोकू लागली, तिथूनच गुलामी खिळे ठोकू लागली.
पगडीची,गादीची अन कोटाची फौज उभी राहिली,पारतंत्र्याच्या पायात पत्रा ठोकू लागली,
लढणाऱ्या हातात पुस्तके पडू लागली,तिथूनच वाघिणीच्या दुधाची चटक बघा लागली.
गुरगुरणारे वाघ बैलं खाऊ लागली, मातीच्या तोंडच शेण खाऊ लागली,
लोभसाधनेच्या आहारी माती खाऊ लागली आणि गायीच्या नावाने मते मागू लागली.
देव, दानवे, स्मशाने, मंदिरे मतपेट्या बनू लागली, अन कष्टकरी,शेतकरी,सैनिक,चाकरमानी शवपेट्या बनली,
संशयाची फुले शोर्यावर पडू लागली, तिथूनच धोक्याची घंटा ऐकू आली.
माणसातली माकडं आता डोकं काढू लागली, सुव्यस्थेच्या बुडात घुसलेली बोटं वाढू लागली,
लोकं दाखवायचं तेवढंच बघू लागली , तिथूनच मती भ्रष्ट होऊ लागली.
भ्रष्ट मती ला भ्रष्ट मीडिया ने साथ दिली अन लोकं नाटकातल्या राजाला खरा मनू लागली,
दिसू लागलं खरं, खोट्याची भिंत ढासळू लागली, देशभक्तीच्या पडद्यामागे लोकशाही रडू लागली.
-
स्वरराज.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा