ऑगस्ट २०१८ मध्ये कर्नाटक मधील चिकबल्लापूर जिल्ह्यात गंगाप्पा यांना त्यांच्या शेतात मक्याच्या पिकाची पाने कुर्तडलेली दिसली. पूर्ण शेताचं नुकसान पाहताना गंगाप्पा यांच्या डोळ्यात अश्रू आणि राग एकाच वेळी होते. त्यांनी लगेच सरकार दफ्तारी झालेला प्रकार कळवला.
दक्ष अधिकाऱ्यांनीही धारवाड कृषी विद्यापीठाच्या शात्रज्ञांना त्यांच्या शेतात पाठवलं. शास्त्रज्ञांनी शेताची पाहणी केली, त्यांच्यासाठीही शेतातील ही अळी नवीनच होती. शेताची भयावह स्तिथी पाहून त्यांनी तातडीने त्याचे जनुकीय निदान करण्यासाठी अळीचे नमुने भारतीय कृषी अनुसंधान केंद्र दिल्ली आणि National Bureau of Agricultural Insect Resources (NBAIR) यांच्याकडे पाठवले. या दोन्ही संस्थांनी त्याचे DNA तपासले. ८ ते १० दिवसात या संस्थानी त्याचे रिपोर्ट दिले.
परंतु याच ८-१० दिवसात आसपासच्या ४ जिल्ह्यांमध्ये ह्या अळी ने मक्याचे ७०% नुकसान केले होते. एवढ्या झपाट्याने वाढणाऱ्या ह्या नवीन अळी चे नाव आहे फॉल आर्मीवोर्म (FALL ARMYWORM ) म्हणजे लष्करी अळी.
आपल्याकडे अनेक प्रकारच्या लष्करी अळ्या आढळतात परंतू ही अळी भारतातच नव्हे तर आशिया खंडातच आत्ता पहिल्यांदाच पहिली गेली. ती Spodoptera वर्गातील. तिचं वैज्ञानिक नाव Spodoptera frugiperda त्यातील frugiperda म्हणजे फ्रुटलॉस, म्हणजे थेट उत्पादनाचे नुकसान करणारी अळी. तिचे मूळ ठिकाण उत्तर अमलेरिकेतील, तिने भारतातच नव्हे तर पूर्ण आशिया खंडात मे २०१८ मध्ये पहिल्यांदा प्रवेश केला आहे. ह्या आधी जानेवारी २०१६ म्हणजे २ वर्षांपूर्वी आफ्रिका खंडातील नायजेरिया देशात ती पहिल्यांदा आढळली. डिसेम्बर २०१७ पर्यंत म्हणजे अवघ्या २ वर्षात तिचा प्रादुर्भाव आफ्रिका खंडातील ४४ देशात झाला होता. नाही म्हंटले तरी मागास देश तेव्हा जागतिक अन्न व शेती संस्था, संयुक्त राष्ट्र ,जागतिक आरोग्य संस्था यांनी स्वतः लक्ष घातले. ह्या संस्था आफ्रिकेच्या मदतीला धावल्या.
पूर्ण आफ्रिका खंडात अन्नधान्याचा तुटवडा झाला, लोक स्थलांतरित होऊ लागले .हजारो जीव माणसांसहित जनावरांचे हि जाऊ लागले. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते बहुतेक देशांच्या १०-१० वर्षांच्या अन्नधान्याचं नुकसान झाले आहे.केनिया देशाला तर त्या अळीला मारण्यासाठी ,पिकांवर फवारणी करण्यासाठी तेथील लष्कराला पाचारण करावं लागलं.
हि अळी फुल, फळ, पान, खोड सहित सर्वच खाते. कापूस, ऊस, बटाटा, कांदा, आले, भुईमूग यांसारख्या जवळपास १०० पिकांवर खाते ,वाढते आणि जगते सुद्धा. त्यामुळं माणसांच सोडाच पन जनावरांना सुद्धा खायाला काही राहत नाही. हि लष्करी अळी खऱ्या खुऱ्या लष्करासारख्या एकामागून एक अश्या एका शेतातून दुसऱ्या शेतात जातात. रात्रीच्या वेळी त्यांचा हा प्रवास जर एखाद्या रस्त्यावरून होत असेल तर ते एखाद्या गालिच्या सारख्या दिसतात. ह्या अळ्या अंकुर आल्यापासून ते काढणी पर्यंत प्रत्येक पातळीवर येतात. फक्त ४८ तासात २० एकर पीक फस्त केल्याचे रेकॉर्ड ह्याच लष्करी अळी च्या नावावर आहे. ठराविक काळानंतर ह्या लष्करी अळी वर कोणतेही कीटकनाशक काम करत नाहीत, असे अनुभव आफ्रिकेतील शेतकऱ्यांचे आहेत.
भारतात हि ८-९ महिन्यापूर्बी तिचा आगमन झालं आहे. ह्यावर कर्नाटक सरकार ने काही पावले उचलावीत असे स्वतः संयुक्त राष्ट्राने सुचवले. भारताबरोबरच पूर्ण आशिया खंडाला जागतिक संस्थांनी धोक्याचा इशारा दिला आहे. भारतीय कृषी अनुसंधान केंद्रानेही इशारा कायम ठेवला आहे. ८-९ महिन्याच्या कालावधीमध्ये ८ राज्यांमध्यें तिचं आगमन झालेलं आहे. तिचं मुख्य पीक मक्का हे आहे. कर्नाटक मध्ये ह्यावर्षी मक्याच्या उत्पादनात मोठी घाट झाली. तेलंगणा राज्याने तर खराब झालेला ४००० टन मक्का पोल्ट्री वाल्याना कमी दारात देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतला ह्यावर्षी मक्का आयात करावा लागेल. थायलंड , इंडोनेशिया, जपान ह्यांनी आधीच दक्षतेच्या उद्देशाने लष्करी अळी च्या जण जागृतीची मोहिओं उघडली आहे. तेलंगणा मध्ये त्याचवेळी फेरनिवडणूक झाल्या, बऱ्यापैकी शेतकरी समस्यांवर प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक राज्य असल्यामुळे त्यांनी प्रयत्न चालू केले. उत्तर भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी आणि सरकार दोघं हि जरा ह्या बाबतीत निवांत असल्यासारखे दिसतायत. कारण देशासमोर सध्या एक सुपरहिट चित्रपट चालू आहे. खान्देश, मराठवाडा, सोलापूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये लष्करी अळी पोहचली आहे. सोलापूर मध्ये तर ती उसावर सापडली. डाळी,गहू,मक्का, तेलबिया,ज्वारी यांचे वाढलेले दर सांगतात कि बाजारात आवक घटली आहे. अजून २ महिने म्हणजे ६० दिवस बाकी आहेत पुढच्या पेरण्यांना, पण सध्या पुढाऱ्यांचा सिझन चालू आहे, उत्पादनांचे मेट्रिक टनमधले आकडे ऐकायला भेटतील आणि ऐकून आपण खुश होऊन जाऊ. येणाऱ्या हंगामात घामासोबत रक्ताचे थेंब गळायचे नसतील तर लवकरात लवकर कृषी विभागाने ह्याविषयीची जनजागृती करावी. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शेतकऱ्यांच्या जीवनाचा धुराळा उडू नये एवढीच निसर्गचरणी प्रार्थना.
नव्या हल्ल्यांची सुरवात झाली आहे, जे पुलवामा हल्ल्यापेक्षाही भयानक आहेत.
धन्यवाद.
Comments
Post a Comment