मुख्य सामग्रीवर वगळा

काय बदलले ...?

काय बदलले , काय बदलले ?
रंग ना हलले रूप बदलले 
खाणाऱ्यांचे मार्ग बदलले.
वेळेवरती बाप बदलले
जखमेवरचे मीठ बदलले.


काय बदलले काय बदलले ?
टोचणारे काटे बदलले
चकवणारे फाटे बदलले,
वाट्याचे वाटे बदलले,
होणारे घाटे बदलले.

काय बदलले, काय बदलले ?
मर्दानगीचे नियम बदलले,
देशभक्तीचे नाव बदलले
खरे खोट्यात बदलले
आणि खोटे नाहीच बदलले.


काय बदलले काय बदलले ?
लोकांचे ग्रह बदलले,
ग्रहांचे तारे बदलले,
शब्दांचे वापर बदलले,
स्वतः शब्द पण बदलले.

काय बदलले काय बदलले ?
फेसबुकचे फायदे बदलले,
ट्विटर चे तोटे बदलले,
 व्हाट्सअपने सत्य बदलले,
टीव्हीने तर आपले धंदे बदलले.

काय बदलले काय बदलले ?
देवांचे काम बदलले,
बोलणाऱ्यांचे राम बदलले,
महापुरुषांचे मान बदलले,
दानपेटीमधले दान बदलले. 

काय बदलले काय बदलले ?
शेतीचे प्रश्न बदलले ?
उत्तरांचे स्वर बदलले,
शेतावरच चोर बदलले, 
आणि फासावरचे दोर बदलले.


काय बदलले काय बदलले ?
बुद्धिबळातले प्यादे बदलले,
लावायचे घोडे बदलले,
पुस्तकातले धडे बदलले,
आणि लोकशाहीचे खांबच बदलले.

- स्वरराज.

टिप्पण्या