मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Szimpla Kert Budapest Hungary Travel Ruin Bar Travel Blog Marathi Travel Blog Indian Traveler Europe Travel लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Szimpla Kert, Budapest | स्वातंत्र्याचा अनुभव देणारा जगप्रसिद्ध Ruin Bar

प्रवासात काही ठिकाणं आपण शोधतो… आणि काही ठिकाणं आपल्याला शोधून काढतात.  Szimpla Kert असंच एक ठिकाण आहे — जगातील Top 3 Ruin Bars पैकी एक हंगेरी – बुडापेस्टच्या प्रवासात असंच एक नाव अचानक कानावर पडलं – Szimpla Kert . Local Free Guide Tour दरम्यान सहज बोलताना गाईडने या जागेचा उल्लेख केला आणि त्याबद्दलची एक अनोखी गोष्ट सांगितली. त्या क्षणी काही विशेष वाटलं नाही, पण ते नाव मनात कुठेतरी खोलवर रुतून बसलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी dinner साठी कुठे जायचं यावर चर्चा सुरू झाली. अनेक पर्याय होते, पण नकळत Szimpla Kert चं नाव पुढे आलं. Google वर फक्त location पाहिली होती; त्या जागेचा अनुभव, vibe किंवा atmosphere याबद्दल आम्ही पूर्णपणे अनभिज्ञ होतो. बुडापेस्टमध्ये हिवाळ्यात सूर्य लवकर मावळतो. चार वाजताच अंधार पडलेला. पाच-सहा वाजता कडाक्याच्या थंडीत बस शोधत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. बाहेरून पाहिलं तर रस्ता शांत, मोकळा आणि जवळजवळ निर्मनुष्य. फक्त ३–४ लोक बाहेर उभे. क्षणभर वाटलं – “आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही ना?” पण प्रवासात कधी कधी शंका ओलांडली कीच खरा अनुभव मिळतो. हिम्मत करून मी, पियू आण...