येड्यांची जत्रा. चित्रपट क्षेत्र असो किंवा नाटक अस्पृश्य विषयांना पहिलस्पर्श करण्याची हिम्मत जर कोणाची असेल तर ती मराठीचाच असावा असा माझा दावा नाही पण हे खोत हि नाही. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये हिंदी च्या आधीच समांतर सिनेमा हा तद्दन व्यावसायिक सिनेमाच्या पुढे सरकला होता. व्यावसायिक चित्रपटांनी हि कधी हि त्यांची मर्यादा ओलांडल्या नाहीत आणि समांतर सिनेमांनी त्यांचे काम सोडले नाही. आजच्या परिस्थितीमध्ये समांतर आणि व्यावसायिक असा भेद मराठी सिनेमांमध्ये राहिलाच नाही. येड्यांची जत्रा हा चित्रपट २०१२ मधील आहे. याच वर्षी राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाबू बॅंड बाजा, काकस्पर्श, तुकाराम, पिपाणी, बालक पालक आणि शाळा सारखे सुंदर आणि यशस्वी मराठी चित्रपट आले. महेश मांजरेकर, गजेंद्र अहिर सारखे दिग्दर्शक , रितेश देशमुख सारखा लोकप्रिय कलाकार हे मराठी चित्रपट सृष्टीकडे २०१२ पर्यंत पूर्णपणे वळले होते. मराठी सिनेमाकडे पडणारी पावले वाढली होती. त्या वेळेतील येड्यांची जत्रा हा टिपिकल मराठी मनोरंजन करणारा सिनेमा आला होता. बऱ्याच जणांनी पहिला असेल परंतु ज्यांनी नसेलच पहिला त्यांच्यासाठी टॉयलेट एक प्रेम कथा सा
Comments
Post a Comment