प्रति,
भरधाव पुणेकर,
मु.पो.वाऱ्यावर
तालुका. वेगाच्या मागे.
जिल्हा.वेळच्या पुढे.
प्रिय पुणेकर,
नमस्कार सादर प्रणाम. आजच्या धावपळीच्या आणि वेगवान दळणवळणाच्या युगात आम्ही रोजच्या तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चाललो आहेत. परंतु प्रत्येक वेळी तुमच्या अपशब्दांचे धनी बनत असतो. कदाचितच कधी आजपर्यंत आमच्यासाठी कोणी चांगले शब्द पण काढत असेल. आज वेग हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. ज्याचा वेग मंदावला तो स्पर्धेतून मागे पडला हे अगदी सर्वश्रुत आहे आणि इथेच आमचा प्रवेश होतो. आम्ही पुण्याच्या सर्व रस्त्यांवरील पुणेकरांच्या वेगाला कमी करणारे गतिरोधक आहोत. खरंच आम्ही गतिरोधक म्हणजे आजच्या मराठीत स्पीड ब्रेकर आहोत. आमच्या नावे बोटे मोडताना आपण आमचे अस्तित्व विसरू नयेत म्हणून आज सर्वानी मिळून तुम्हाला चार शब्द लिहायचे ठरवले आहे. आणि म्हणूनच हे पत्र लिहायला घेत आहोत. कदाचित गतिरोधक हा शब्द सुद्धा ऐकायला जड जात असेल ना ? इथून पुढे आजच्या बोलीभाषेतील स्पीड ब्रेकर हा शब्द पुढच्या पूर्ण पात्रात आम्ही वापरात आहोत म्हणजे कदाचित आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचतील.
पत्रास कारण कि, जीवनाचा वाढणारा वेग गतिरोधक शब्दाचा हि विरोधक होत चालला आहे. नावाप्रमाणेच आमचे काम गतीला कमी करणे हेच आहे. कदाचित तो तुम्ही 'थांबवणे' असा घेतला आहेत म्हणून आमचा एवढा राग राग करत असतात. तुमच्या दिवसभराच्या प्रवासात येणाऱ्या किती स्पीड ब्रेकर्सबद्दल आपल्या मनात चांगल्या भावना आहेत ? किती ठिकाणी त्यांना बगल देऊन तुम्ही पुढे जातात ? स्पीड ब्रेकर चुकवणे हि एक कला होऊन बसली आहे. जर त्याच्या बाजूने जागा नसेल तर त्याला खोदून जागा केलेली असते. रस्त्यातील ते स्पीड ब्रेकर चुकवण्यासाठी आपण रस्त्यावरून खाली उत्तरायलाही तयार असतो. दुचाकी स्वार तर ह्या कलेचे पारंगत खेळाडू आहेतच परंतु चार चाकी वाले सुद्धा गाडीचा कुत्रा करत एक पाय वर करून निघून जातात. आम्ही इतके नकोसे किंवा त्रासदायक झालोय का ? ठीक आहे ह्यामध्ये आम्ही हि दोषी आहोत , पहिला दोष हा आहे कि आमचा संदेशच तुमच्यापर्यंत चुकीचा गेला आहे. दुसरे म्हणजे आमचे वेडे वाकडे आकार. त्यांना कोणतीही सुसूत्रता नाही , एकसंधपणा नाही . प्रत्येक ठिकाणी आमचे आकार उकार निराळेच. देशभरामध्ये दरवर्षी जवळपास ४ ते ५ हजार मृत्यू आमच्या या निराळेपणामुळे होतात. अपघातांचे प्रमाण तर अजून किती तरी असेल. स्पीड ब्रेकर कुठे असावे, कसे असावे , किती लांब, किती रुंद , किती उंच असावेत, कशाचे बनलेले असावेत हे फक्त कागदावरच राहिले आहे. भारतात दिल्ली मध्ये यासाठी एक-दोन संस्था पण आहेत. आमच्या शास्त्रशुद्धतेसाठी तुमच्या पैश्यातून संशोधन हि केले जाते. तरीही जेव्हा स्पीड ब्रेकर बांधले जाते तेव्हा कोणत्या नियमांनी बांधले जाते हे त्या बांधणाऱ्यास आणि त्यातून आर्थिक फायदा पाहणाऱ्यासच माहिती असतात. आमचे बेढब रूप तुमचे शारीरिक शोषण तर करतेच परंतु मानसिक हि करत असते. कुठे रंग नाहीत, कुठे दिसतच नाहीत, कुठे दबलेले, खचलेले, फुटलेले तर कुठे नको असलेले स्पीड ब्रेकर्स रोजच्या रोज तुमच्या कपाळावर आट्या वाढवतात हे आम्हालाही मान्य आहे. आणि त्यासाठी रोजची शिवीगाळ आम्ही मुकाटपणे सहन करत असतो. विना स्पीड ब्रेकरचा मार्ग म्हणजे आपल्यासाठी गालिचाच वाटतो.
आम्ही फक्त तुमचा वेग मंदावण्यासाठी असतो तुम्हाला थांबवण्यासाठी नाही हे कृपा करून समजून घ्या. वेगवान जीवनात असे स्पीड ब्रेकर्स गरजेचे असतात त्यांचे फायदे हे असतातच. नव्या दमाची तरुण पोरं तर "स्टंट" साठी आमचा वापर करतात. एखाद्या वळणावर , चौकात , शाळा, महाविद्यालये दवाखाने इत्यादी ठिकाणी आमचे अस्तित्व तुमच्या सोबतच समोरील एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठीच असते. तुमचा मंदावलेला वेग तुम्हाला पुन्हा वेगवान होण्यासाठी तयार करत असतो. डोक्यात चाललेले विचारांचे वादळ थांबवून पुन्हा जमिनीवर आणण्यासाठी स्पीड ब्रेकर असतो. तो दिसला कि त्याला चुकवण्याचा प्लॅन बनतो आणि क्षणात तो अमलात आणला जातो. आमचे आकार त्रासदायक असतील परंतु आमची भावना त्रासाची नक्कीच नसते. आणि काय हो पुणेकर कशासाठी हि कोर्टात जाणारे आणि हक्कासाठी लढणारे तुम्ही, का नाही आमच्यासाठी कधी भांडलात ? आमचे रूप रंग,आकार,ठिकाण यासाठी का नाही जबाबदार व्यक्तींच्या नावाने पाट्या लावत फिरलात? तुमचे गाडीचे होणारे नुकसान,पाठीच्या वाढणाऱ्या वेदना आम्हाला शिवीगाळ केली कि होतात का हो ठीक ? आज आम्ही स्वतः सर्वजण मिळून तुमच्यापर्यंत तुमचेच होणारे हाल आणि वाढणारे प्रश्न घेऊन आलो आहे. आम्हालाही वाटते कि आमच्यामुळे प्राण जाण्या ऐवजी वाचले जावेत. आम्ही ज्या कामासाठी सर्वांच्या टापांखाली रोज झिजतो आहे, त्या कामासाठी शाबासकीचे शब्द तरी मिळावेत. शहराच्या सुशोभीकरणात आणि एकूण आरोग्यात आम्ही हि उठून दिसावे. कागदावरच्या आमच्या मापदंडांना कधीतरी रस्त्यावर उतरवावे. रस्त्यावर पडलेल्या मृतदेहासारखे जगण्याऐवजी शाश्वत जीवनाचा क्रियाशील भाग बनावे. प्रगतीच्या वेगाला आमचेहि हातभार असावे.
डोक्यातील राग आणि दुःख शांत करत आम्ही पात्र आटोपते घेताना सर्वांच्या वतीने एक नम्र विनंती करतो कि, येणाऱ्या गतिरोधकाला विरोधक न समजता आपल्या सुखी आणि निरोगी जीवनाचा वर्धक समजावे.आमचे वाढत जाणारे जाळे ओबढधोबड, फाटके तुटके न ठेवता ते सुंदर कलात्मक विणकाऱ्याने विणावे असे बनवावे.. त्यासाठीचे नियम, मापदंड पळाले जावे. सरतेशेवटी बरं झालं तो गतिरोधक होता म्हणून वाचलो असे शब्द कानी पडावे.
धन्यवाद.
प्रेषक,
श्री. गतिरोधक
मु.पो. प्रत्येक वळणावर
तालुका- कसेही गाव.
जिल्हा-कोठेही लाव.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा