मुख्य सामग्रीवर वगळा

पत्रास कारण कि,

प्रति,
स्वच्छ पुणेकर,
मु.पो- सुंदर पुणे
ता.-निरोगी पुणे
जि. स्वच्छ भारत

प्रिय पुणेकर,
कसे आहात ? स्वच्छतेचे धडे नीट गिरवताय ना ? हे धडे आपल्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत हि गिरवत आहे. जरी आज आम्ही पुणेकरांसाठी पत्र लिहीत असलो तरी ते पुणेकरांनी इतर सर्व शहरांना हि पोहोचवावे हि विनंती. विनंती पत्राच्या सुरवातीलाच करत आहोत कारण आमचा प्रश्न फक्त पुण्याला नाही तर तो सर्वांसाठीच आहे. तुम्हाला आमची कमतरता जाणवत असेल, आणि जिथे आम्ही उपस्थित असू हि तिथे आमची अवस्था बघून तुम्हालाही वाईट वाटत असेल. म्हणून आम्ही पुणे शहरातील सर्व सार्वजनिक प्रसाधन गृहे(मुताऱ्या) ,शौचालये एकत्र येऊन आपणास पत्र लिहीत आहोत. पत्रास कारण कि,असलेली आमची संख्या , असलेल्या कोणत्याही प्रसाधन गृहाचे झालेले हाल , तिथली स्वच्छता हि फारच दुय्यम दर्जाची होत चालली आहे. किंबहुना ती दुय्यमच राहिली आहे. तुम्ही फिरायला, कामाला किंवा अगदी सहजच जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुम्हाला कधी हि कोठेही "नैसर्गिक कॉल" येत असेलच त्यावेळी तुम्हाला आमची आठवण नक्की येत असेल. तुम्ही आमच्या शोधात सैर-भैर होऊन फिरता. नशिबाने आम्ही सापडलोच तर तिथल्या स्वच्छतेवर नाक मुरडून तुम्ही नाकावर रुमाल धरत आपली क्रिया आटोपून निघून जाता. परत तिकडे फिरकावे लागू नये अशी मनोमन इच्छा व्यक्त करून हवं तर आमच्या भिंतींवर थुंकून निघून जाता. त्यातही तिथली परिस्थती अगदीच खराब असल्यास आतमध्ये जाण्याची तसदी सुद्धा घेत नाही. आमच्या दावाज्यावरच गोळ्या मारून निघून जाता. जर का सापडलो नाहीच तर मिळणाऱ्या कोणत्याही निर्जन कोपऱ्याला आमच्या रांगेमध्ये आणून आपले काम करून गुपचूप निघून जाता. आज अगदी "भरल्या" मानाने आम्ही आपणाकडे चार शब्द बोलत आहोत. हे पत्र जेव्हा तुमच्या हातात येईल तेव्हाही कदाचित तुम्हाला आमच्या उग्र वासाची आठवण होईल. एवढे आमचे निर्दयी स्वरूप तुमच्या नाकानाकामध्ये बसले आहे. आमच्या उपस्थतीतीमुळे जवळच्या जमिनीचे भाव घटतात. ते घटू नयेत म्हणून आमची उचलबांगडीही होते. काही ठिकाणी तर आम्ही सशुल्क आहोत तरीही आमच्या आरोग्याची काळजी अगदीच तोडक्या स्वरूपात घेतली जाते. सर्वात वाईट हाल तर सार्वजनिक ठिकाणी म्हणजे बस स्टॅन्ड वरचे आमचे सहकारी अगदी तुटपुंज्या आणि तोडक्या स्वच्छतेत आपली सेवा करत आहेत. जिथून शहराची सुरवात होते तिथेच आमची सुरवात अशी होत असेल तर शहरभर जे काही बोटावर मोजण्या इतके आम्ही सर्व असू त्यांचे स्वरूप तर न आठवलेलेच बरे. तळीरामांच्या बाटल्या, तंबाखू-गुटखा वाल्यांच्या पिचकाऱ्या, पण-सुपारी वाल्यांचे लाल प्रसाद,नको झालेल्या वस्तू,कागद,कचरा हे सर्व आमच्या एवढे कदाचितच कोणी सहन करत नसेल. आमच्या निगराणीवर असणारे सफाई कामगार त्यांच्या क्षमतेने जमेल तेवढे प्रयत्न करत असतात. ते तरी किती आणि कसे पुरे पडतील ? लोकसंख्येचा वाढता आकडा आमच्या सहित त्यांच्यावर हि तेवढाच भार टाकतो. मोठ मोठ्या मॉल मध्ये असणारी सफाई बघितली कि आम्हाला हेवा वाटतो कि आमचे सहकारी एवढ्या ऐशो आरामात कसे काय असतात.? तिथे गेल्यावर जनावरांचाही माणूस कसा होतो ? आणि सार्वजनिक शब्द लागला हि तोच माणूस जनवरासारखा कसा काय वागतो ?


आम्ही सार्वजनिक प्रसाधन गृहे एकतर पहिलेच संख्येने कमी आहोत. त्यात आमच्या आरोग्याचे तीनतेरा वाजलेले आहेत. आम्ही सार्वजनिक आरोग्यामध्ये एखाद्या टाइम बॉम्ब सारखे झालो आहोत. तिथे घोंगावणाऱ्या  सर्व जीवजंतूंसाहित तुमच्या पायातील चपलेसोबत आम्ही घरापर्यंत आजार पोहचवणारे "स्लीपर सेल्स " बनलो आहोत. आम्ही स्वच्छता राखण्यासाठी आहोत. रोगराई पसरवू न देण्यासाठी आहोत. तुमच्या अडचणीच्या वेळी एखाद्या मित्रासारखे आहोत. पुरुषमंडळी तुम्ही तरी सुखी म्हणावे असे आहात पण सार्वजनिक ठिकाणी झालेल्या अडचणी मध्ये महिलांसाठी तर आम्ही अगदीच नगण्य आहोत. त्यांच्या जीवाची होणारी फरफट आमच्यालेखी तरी सहन न होणारी आहे. पुण्यातल्या तुळशी बाग, लक्ष्मी रोड, एफसी रोड, दगडूशेठ  सारख्या ठिकाणी आम्ही कुठे आहोत, कसे आहोत हे आठवतंय का ते बघा बरं? आम्ही तुमच्या सेवेत कधी हि कुठेही हजर असावे यासाठी कोणत्याही हॉटेल मध्ये तुम्ही जाऊ शकता आणि आमच्या खासगी सहकाऱ्यांचा वापर करू शकता यासाठी सरकारी कायदा हि आहे असे आमच्या ऐकिवात आहे. तरीही हॉटेल वाले लोक तुमच्याकडे पुन्हा इकडे आलास तर चिरून तुझी भाजी करेन अश्या नजरेने पाहत असतात. काय करणार ते हि शेवटी पुणेकरच ना . आपल्या पुण्यातील कोणतेही महत्वाचे ठिकाण आठवा मग ते बालगंधर्व असो किंवा दगडूशेठ गणपती , स्वारगेट असो कि शिवाजीनगर , कॅम्प असो किंवा तुळशी बाग तिथल्या आमच्या सहकाऱ्यांची आठवण करून बघा. एकतर आम्ही आठवणार नाहीत किंवा आठवू वाटणार नाहीत असेच आहोत. आमची हि काडीमात्र इच्छा नाही कि आम्ही तुमच्या निरोगी आयुष्यात येऊन घाण करावी, तुमच्या थुंक्या झेलाव्यात, तुमच्या शिव्या ऐकाव्यात. हे सर्व बदलायला हवे. पुणे आता स्मार्ट होणार आहे असे ऐकले आहे. चालती  फिरती शौचालये पण आली आहेत असे पेपर मध्ये वाचले आहे. पुण्याला कोणी स्मार्टपणा शिकवू नये असे आम्ही नेहमी ऐकत असतो. आम्ही हि तो शहाणपणा  करणार नाही. आज आम्ही तुमच्याकडे विनंती करण्यासाठी आलो आहोत. कृपा करून पहिले तर सार्वजनिक प्रसाधन ग्रहांचा वापर करायला शिका. वापर करताना तिथल्या स्वच्छतेची काळजी प्रत्येक सुजाण नागरिकांची जबाबदारी आहे. ते साफ करणाऱ्या सफाई कामगारांचे आभार मानले पाहिजेत कि तुमची केलेली घाण ते लोक जमेल तेवढी का असेना साफ करतात. जिथे आमची सफाई होत नाही तिथल्या लोकप्रतिनिधीला पहिला प्रश्न विचारा. आमची काळजी घेण्याची जबाबदारी घेतलेल्या अधिकारी वर्गाला जाब विचारा. आम्ही बोलू शकलो असतो, संप करू शकलो असतो तर ते हि केले असते. तुमच्या अडचणीच्या वेळी आमची जबादारी आहे कि तुम्हाला योग्य ती मदत केली पाहिजे तशीच आमच्या आरोग्याची स्वच्छतेची जबाबदारी तुमच्यावर आहे हे विसरू नका. तुमची सेवा करण्यात आमची कमी पडत असलेली संख्या वाढवण्यासाठी प्रशासन , सरकार शक्य त्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहचवा. स्वच्छतेचा दागिना आमच्याही गळ्यात पडावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. पत्रामध्ये आणखी काही घाण वरती आणण्या आधीच आम्ही निर्मळ मनाने हे पत्र आटोपते घेत आहोत. पत्राच्या शेवटी, स्मार्ट पुण्याच्या स्मार्ट आरोग्याचे वाहक म्हणून आमची हि गणती व्हावी, स्वच्छ भारताच्या अंगणात स्वच्छ प्रसाधन गृहे खेळवीत आणि आमची जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावर न टाकता ती आपली स्वतःची हि मानवी व फक्त पुण्यातच नवे तर आपल्या सर्व शहरांमध्ये आमच्या अडचणी पोहचाव्यात आणि त्यांचे निराकरण व्हावे हि कळकळीची विनंती .

धन्यवाद.
कळावे.

आपले निरोगी,
सार्वजनिक प्रसाधन गृह.

प्रेषक,
सार्वजनिक प्रसाधन गृहे.
मु.पो- कुठे कुठे.
तालुका- सार्वजनिक ठिकाणी.
जिल्हा.- सर्वांच्या सेवेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

RBI's New Collateral-Free Loan Policy: A Boon for Farmers

Summary The RBI has raised the collateral-free loan limit for farmers from ₹1.6 lakh to ₹2 lakh, effective January 1, 2025. This aims to ease access to credit for over 86% of small and marginal farmers, addressing rising input costs and boosting agricultural productivity. Key Details Loan Limit Increase : Collateral-free loans increased to ₹2 lakh. Target Beneficiaries : 86% of Indian farmers—small and marginal landholders. Ease of Access : Waiver of collateral and margin requirements simplifies loan approvals. Economic Relief : Helps manage inflationary input costs like seeds, fertilizers, and labor. Synergy with Policies : Complements the 4% interest scheme under the Modified Interest Subvention Scheme. Boost to Rural Economy : Improves credit access and enhances financial stability. Numerical Highlights New Loan Limit : ₹2 lakh (up from ₹1.6 lakh). Subsidized Loans : ₹3 lakh at 4% interest under the subvention scheme. Beneficiary Farmers : Over 86% (small and marginal). Opinion This...

Samsung : Bigger than Google+Microsoft+RIL;They Built Burj Khalifa & Twin Tower

Samsung Built Burj Khalifa & Petronas Twin Tower If you are using Samsung product then feel proud to know these fact that you are a customer of Bigger organisation than  Apple,Google or Microsoft. Samsung HQ-Seoul , South Korea . Lets start the story from the origin. Founder Byung Chul lee - He started Samsung trading corporation with 40 employees & trading in dried fish,noodles & groceries. Steps towards world class corporation  : Sugar refinery Wollen Mill 1960- Electronics 1st product was black and white TV 1980-Telecommunication ( acquired Hanguk Jeonja Tongsin) 1987- Lee died   Separated in 1) Samsung group 2) Shinsegae Group ( discount stores,Departmental stores) 3)CJ group (Food/chemical/logistic/Entertainment) 4)Hansol Group ( paper/Telecommunication) 1990- Construction Bsiness 2008- Galaxy series in Mobile 2010-Computer Programming Now Hold the Breath, Ride started..! Samsung Techwin - Manfacturin...

Lifology

Sometimes life just seems like chapters. Some good, some bad, but all come together to create the story of our lives. Arise Like The Sun. That everyone notice you. Shine like The Moon. No one hurts because of you. flow like a Water. Don't stop, make your own way &  face the obstacles. Be like a Earth . Stable, revolve around yourself. Find everything within you. Live like Nature. Always think of others.