मुख्य सामग्रीवर वगळा

तू चाल पुढं....

येड्यांची जत्रा.

चित्रपट क्षेत्र असो किंवा नाटक अस्पृश्य विषयांना पहिलस्पर्श करण्याची हिम्मत जर कोणाची असेल तर ती मराठीचाच असावा असा माझा दावा नाही पण हे खोत हि नाही. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये हिंदी च्या आधीच समांतर सिनेमा हा तद्दन व्यावसायिक सिनेमाच्या पुढे सरकला होता. व्यावसायिक चित्रपटांनी हि कधी हि त्यांची मर्यादा ओलांडल्या नाहीत आणि समांतर सिनेमांनी त्यांचे काम सोडले नाही. आजच्या परिस्थितीमध्ये समांतर आणि व्यावसायिक असा भेद मराठी सिनेमांमध्ये राहिलाच नाही.

येड्यांची जत्रा हा चित्रपट २०१२ मधील आहे. याच वर्षी राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाबू बॅंड बाजा, काकस्पर्श, तुकाराम, पिपाणी, बालक पालक आणि शाळा सारखे सुंदर आणि यशस्वी मराठी चित्रपट आले. महेश मांजरेकर, गजेंद्र अहिर सारखे दिग्दर्शक , रितेश देशमुख सारखा लोकप्रिय कलाकार हे मराठी चित्रपट सृष्टीकडे २०१२ पर्यंत पूर्णपणे वळले होते. मराठी सिनेमाकडे पडणारी पावले वाढली होती. त्या वेळेतील येड्यांची जत्रा हा टिपिकल मराठी मनोरंजन करणारा सिनेमा आला होता. बऱ्याच जणांनी पहिला असेल परंतु ज्यांनी नसेलच पहिला त्यांच्यासाठी टॉयलेट एक प्रेम कथा सारखा संडास बांधणी या विषयावर हिंदी चित्रपट येण्या आधी आपल्या मातीतला हागणदारी मुक्त गाव, सार्वजनिक संडास बांधणी या विषयावर पाच वर्षे आधीच मराठी चित्रपटाने हलक्या फुलक्या भाषेत हा विषय अगदी गावपातळीवर हाताळला होता. दिग्दर्शक, लेखक मिलिंद कवडे यांनी उत्तमरित्या हागणदारी मुक्त गाव यासाठी आवश्यक त्या कथेचा योग्य वापर करून अगदी छोट्या खेडेगावात होणाऱ्या सर्व गमती जमती दाखवत हा विषय लोकांच्या गळी उतरवला आहे. चित्रपट जास्त विचारी किंवा शहरी लोकांना खूपच कर्कश किंवा आरडाओरडा वाटू शकतो परंतु  गावाकडे छबिना, तमाशा, किंवा एखाद्या नाटकाच्या प्रयोगासारखा आपला वाटावं असा अगदी फिट्ट बसतो.



भारत जाधव, मोहन जोशी, विनय आपटे, संदीप पाठक यांसारखे मध्यवर्ती ताकदीचे कलाकार.सोबत असंख्य छोटी मोठी पात्रे पॅडी कांबळे,विशाखा, सतीश तारे, भूषण कडू चा गुरुजी प्रत्येक जण लक्षात राहतो. गावाकडे सापडणारी सगळी पात्रे आपल्याला सिनेमा मध्ये दिसतात. त्याची लांबी रुंदी खोली कदाचित नसेल बसली व्यवस्थित परंतु मनोरंजनाच्या माध्यमातून लोकजागृतीचा हा प्रयत्न खरंच एकदा पाहण्यासखा आहे.

कथा- दोन दुश्मन गावाच्या मध्ये अडकलेली जमीन, जिचा उपयोग दोन्ही गाववाले हागणदारी म्हणून करत असतात. त्या जमिनीचा मालक हरी शेतीसाठी जमीन मोकळी करण्याची विनंती गावांना करतो पण सरपंच आणि पाटील अश्या दोन पार्ट्यांमध्ये विभागलेले गाव काही केल्या ऐकत नाही. सर्व उपाय संपल्यावर हरी ला सरकारची हागणदारी मुक्त गावाची योजना कळते. तोच स्वतः अधिकाऱ्यांना विनंती करून गावामध्ये ती योजना राबवून घेण्याची जबाबदारी घेतो. यामध्ये त्याचा मित्र वस्तऱ्या आणि त्याची मैत्रीण संगी त्याला मदत करत असतात. परंतु ह्या योजनेसाठी तयार व्हायला हरी ला बरेच गावात उपटावे लागते. गावच्या खोड्या , राजकारण, आणि अज्ञान या सर्वांचा सामना करत कसा हा परवा पुढे सरकतो अशी मध्यवर्ती कथा .
हिंदी सिनेमांच्या बड्या कलाकारांनी तगड्या पैश्यांच्या बदल्यात केलेले " समाज प्रबोधक सिनेमे " आपल्या लक्षात राहतात. त्यांची वाहवा करताना आपण थकत नाही. ते हि सिनेमे वाईट आहेत असे नाही. शेवटी प्रश्न सुटणे महत्वाचे आहे. परंतु प्रकर्षणाने जाणवणारी गोष्ट म्हणजे आपण महाराष्ट्र आणि मराठी म्हणून खूप आधीच ह्या गोष्टी करत आलो आहोत. जे आत्ता होत आहे देशात ते आपल्याकडे ७-८ वर्षांपूर्वीच झाले आहे. आत्ता योजनेच्या प्रचारापेक्षा स्वतःच्या प्रचारासाठी केले जाणारे चित्रपट येऊन पैसे कमावून घेतात आणि येड्यांची जत्रा सारखे लोक प्रबोधनासाठी अगदी योजनेच्या प्रचारासाठी कोणतेही ढोल न वाजवता केलेले चित्रपट दुर्लक्षित राहतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

RBI's New Collateral-Free Loan Policy: A Boon for Farmers

Summary The RBI has raised the collateral-free loan limit for farmers from ₹1.6 lakh to ₹2 lakh, effective January 1, 2025. This aims to ease access to credit for over 86% of small and marginal farmers, addressing rising input costs and boosting agricultural productivity. Key Details Loan Limit Increase : Collateral-free loans increased to ₹2 lakh. Target Beneficiaries : 86% of Indian farmers—small and marginal landholders. Ease of Access : Waiver of collateral and margin requirements simplifies loan approvals. Economic Relief : Helps manage inflationary input costs like seeds, fertilizers, and labor. Synergy with Policies : Complements the 4% interest scheme under the Modified Interest Subvention Scheme. Boost to Rural Economy : Improves credit access and enhances financial stability. Numerical Highlights New Loan Limit : ₹2 lakh (up from ₹1.6 lakh). Subsidized Loans : ₹3 lakh at 4% interest under the subvention scheme. Beneficiary Farmers : Over 86% (small and marginal). Opinion This...

7 Must-Watch Movies About Farmers' Lives in India

  India is a country with a rich agricultural history, and the lives of farmers have been the subject of many films. These movies offer a glimpse into the challenges and triumphs of rural life, and they provide valuable insights into the Indian agricultural system. Here are 7 must-watch movies about farmers' lives in India: Mother India (1957). This classic film tells the story of Radha, a widowed farmer who struggles to raise her two sons in a harsh environment. It is a powerful and moving film that explores the themes of strength, resilience, and the importance of farmer. Do Bigha Zameen (1953). This film tells the story of Shambhu, a poor farmer who is forced to sell his land to pay off his debts. He then sets out to reclaim his land, but his journey is fraught with obstacles. Do Bigha Zameen is a powerful film that explores the themes of poverty, exploitation, and the struggle for justice.                         ...