प्रति,
प्रवासी पुणेकर.
मु.पो. दरवाज्यात.
तालुका : गर्दीच्या रांगेत.
जिल्हा : मिळेल त्या शीटवर
प्रिया पुणेकर
रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सोबत आम्ही रोजच्या रोज न थकता आपल्या सेवेत असतो. रोजच्या गर्दीत आम्ही तुमच्याशी काही बोलावे असे नेहमी वाटत असते परंतु ते काही शक्य होत नाही. म्हणून आज पत्र लिहून आपल्याशी चार गोष्टी करत आहे. पत्रास कारण कि, नवीन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आमची चुलत बहीण मेट्रो आता आपल्या सेवेत येत आहे. तेव्हा आमच्याकडे फारसे लक्ष दिले जाईल असे वाटत नाही. म्हणून तुम्ही पूर्णच विसरून जाण्याआधी काही आठवणी आणि अडचणी आपणास सांगण्यासाठी आम्ही सर्व जणी मिळून हे पत्र लिहीत आहोत. १९४० पासून पुणे शहराच्या सेवेत आम्ही वेगवेगळ्या नावाने कार्यरत आहोत. त्यापैकी पी एम टी नाव आपल्या सर्वांच्या ओळखीचे आणि जिव्हाळ्याचे असावे. पहाटे ५.३० पासून रात्री १२ वाजे पर्यंत आम्ही तुमच्या सेवेत धावत असतो. कोणी कामावर जात असते , कोणी शाळा कॉलेजात , कोणी पाहुण्यांकडे तर कोणी खरेदीसाठी जाण्यासाठी निघतात, तेव्हा तुम्हाला वेळेवर आणि सुखरूप पोहचवण्या साठी आम्ही सदैव तत्पर असतो.वेळेप्रमाणे आमचे रंग रूप बदलत राहिले. आजकाल वाढलेल्या लोकसंख्येचा भार आमच्यावर हि पडत राहिला. ओझ्याने झुकलेलो असतानाही शक्य तितक्या ताकदीनिशी आम्ही आपल्यासाठीच धावत आलो. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे काही अविस्मरणीय क्षण तर काही जणांचे वाईट अनुभव हि आमच्याशी जोडले गेले असतील. एवढ्या सगळ्या पसाऱ्यामध्ये एखाद्या बस कडून झालेला आपला भ्रमनिरास आम्हास मान्य आहे आणि त्याबद्दल दिलगिरी हि आहे. आमच्यापैकी आजही कित्येक जुन्या वयाने वरिष्ठ बसेस आपली सेवा इमाने इतबारे करत आहेत. त्याबदल्यात त्यांची घेतली जाणारी काळजी मात्र थोडीशी चिंताजनक आहे. आमच्या इंजिन चे खराब झालेले घसे, फाटलेले पत्रे, कासावीस खिडक्या, तुटलेल्या बैठका पाहून तुम्हालाही राग येत असेलच तसाच तो आम्हालाही येतो.
नव्या दमाच्या शांत स्वभावाच्या श्रीमंत बसेस आज आपल्यात आल्या आहेतच आणि पुढेही येतील. परंतु जून ते सोन असणाऱ्या आपल्या संस्कारामध्ये आमच्यापैकी जुन्या असणाऱ्या बसेस मध्ये किती सोन उरलाय हा हि प्रश्नच आहे. आमचे वाहक आणि चालक मंडळी रोज सकाळी देवाचं नाव घेऊन आमची कळ फिरवतात, चाके फिरू लागतात परंतु आमची आरोग्यावस्था हि देवाच्या भरोसेच राहून गेली आहे. आमचे कपडे लाल रंगावरून आता शुभ्र रंगाचे झाले परंतु तरीही आमच्या नशिबी शांतता फार थोडी येते. रस्त्यावर चालणारे वाहनचालक असतील किंवा पादचारी आम्हाला अगदी वैऱ्याच्या नजनरे पाहतात. यात त्यांचे काही चुकते आहे असे नाही , घर घर करणारे इंजिन, फुफुसातून निघणारे काळे धूर आणि वाकडे तिकडे आमचे अवाढव्य शरीर पाहून भीती वाटूच शकते.
आम्ही आपल्या आठवणी जपून , आपली मते मान्य करून, आपले त्रास कमी करण्यासाठीच जिवाच्या आकांतानाने आपली सेवा करण्याचा प्रयत्न गेली ८० वर्षे करत आहोत. नवीन कोणाच्या येण्याने आमच्याकडे दुर्लक्ष होणार नाही, आमच्या सोबत असणारे आपले जिव्हाळ्याचे संबंध संपणार नाहीत आणि शक्य तितक्या लवकर आमच्या आरोग्यावस्थेकडे आपण स्वतःहून काळजी घेण्यास जबादार व्यक्तींना भाग पाडाल, आमचा आवाज बनून तुम्ही प्रवासी पुणेकर सर्व कार्यालयांमध्ये आमच्याही अडचणी पोहचवाल अशी अपेक्षा करून हे पत्र आटोपते घेतो. तुमच्या येणाऱ्या पिढीला कदाचित आम्ही संग्रहालयातच भेटू परंतु तिथे तरी आमच्या चांगल्या आठवणी आणि सेवेच्या अविरत व्रताचे फलक असावेत हि अपेक्षा.
कळावे.
आपली लाडकी.
पी एम टी.
प्रेषक,
पी एम टी
तालुका : बसस्थानके
जिल्हा : भंगाराच्या ढिगाऱ्या शेजारी.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा