प्रति,
पुणेकर मैदानवाले.
मु.पो.कधीतरी मैदानावर.
तालुका: मैदानाच्या बेंचवर
जिल्हा : मैदानाच्या कोपऱ्यावर.
प्रिया पुणेकर,
आजकाल आपली वाढती गर्दी पाहून आम्हा सर्व मैदानांचा उर अगदी भरून येतो.आम्हालाही मैदान म्हणून मिरवायला हुरूप येतो. तुम्ही येतच असतात तर म्हंटल चला आज तुमच्याशी दोन शब्द बोलूच. पण तुमच्या कानात आजकाल स्वतःचाच आवाज घुमवणारी बोळे लागलेली असतात त्यामुळे आमचा आवाज काही पोहचायलाच तयार नाही. म्हणून आम्ही सर्वानी एकत्र येऊन पत्र लिहायचं ठरवलं. पत्रास कारण कि, आपली शहरे दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगत होत आहेत. वाहतुकीची नवी साधने वाढत आहेत. परंतु या वाढत्या सुविधांमध्ये आम्हा मैदानांचा गळा आवळला जातोय. मैदानाचे बगीचे होत चाललेत. पायामध्ये माती पेक्षा कृत्रिम गवत वाढू लागले आहे. शहरातील प्रगती ज्या वेगाने पुढे पाऊले टाकत आहे त्या वेगाने मैदाने आकुंचन पावत आहेत. तुम्ही म्हणाल कि उभ्या राहणाऱ्या प्रत्येक इमारती सोबत प्ले ग्राऊंड्स पण बांधली जातात, "अमेनिटीज " मध्ये असतात. मग तुम्ही मैदाने का ओरडतायत ?
पुणेकरणांनो, मैदाने आणि अमेनिटीज मध्ये धोनी आणि विराट एवढा फरक आहे, तो मॅट वरच्या आणि मातीतल्या पहिलवानामध्ये असलेल्या फरका एवढा आहे,तो संगीतातल्या "ओरिजिनल" आणि "रिमिक्स" एवढा फरक आहे. आमच्या पैकी प्रत्येक मैदान आपल्या क्षमतेपेक्षा जास्त आरोग्यप्रेमींच्या सेवेत आहे. प्रत्येकाला चालायचंय, धावायचंय, खेळायचंय,गप्पा मारायचेत, कोणाला भेटायचंय,कोणाला बोलायचंय, वाढत्या वस्ती सोबत आमचे आकार मात्र कधी वाढले नाहीत. कुठेही प्रगतीचे पाऊले टाकायची म्हंटल तर पहिली गदा आमच्या जागेवर येते. महापुरुषांचे वंदनीय पुतळे, त्यांची स्मारके, आजूबाजूला चाट मसाले वाल्यांच्या गाड्या, तिथल्या चौपाटीवर येणाऱ्यांची वाहने आणि पूर्ण गल्लीचा कचरा यातून राहणाऱ्या जागेत तुम्हा सर्वांची सेवा करणे. जीव अगदी गुदमरायला होतो हो. मैदानावर आरोग्यप्रेमींशिवाय दरात प्रेमींना हि जागा द्यायची असते. इतरवेळी थोडी सुट्टी घ्यावी आणि आराम करावा म्हंटल तर मोर्चे आणि सभा आहेतच. तुम्हा सर्वाना बरं वाटावं किंवा काम दिसावं म्हणून त्याच मैदानावर विविध उपकरणे येतात, फिरायला गुळगुळीत रस्ते बनवले जातात, आकर्षक झाडे लावली जातात, रोमहर्षक दिवे लावले जातात, बसायला बेंचेस बसवले जातात. ह्या सगळ्या मध्ये तुमचा जर मातीलाच पाय लागत नाही तर तुम्ही त्याला मैदान कसे काय म्हणता. अश्या मैदानावर खेळाडू कमी आणि दिखाव्याचे पुतळे निर्माण होताहेत. खास मैदान अनुभवायचे असेल तर त्यासाठी मेम्बरशिप आली, क्लास आले, पैसे आले. आम्ही मैदाने खेळण्यासाठी भाड्यावर वापरली जाऊ लागलोय. मैदानाचे बगीचे झाले म्हणजे प्रगती झाली, म्हणजे आरोग्य सुधारले, म्हणजे सुख नंदू लागले. जिथे घामाच्या धारा थंड पाण्याच्या झऱ्यासारख्या वाटतात ते मैदान, दिवसभराच्या कर्णकर्कश कल्लोळापासून दोन शांतीचे क्षण मिळतात ते मैदान,खड्या-मातीच्या गालिच्यावर पायातून मुंग्या निघतात ते मैदान, युद्धांची रणभूमी म्हणजे मैदान, धेय्यवेड्या खेळाडूंच्या सुखकारी वेदना पाहतो ते मैदान, थंड वाऱ्यांच्या हिंदोळ्यावर पायाला मायेची उब देणारे मैदान, महाराष्ट्राला राकट देशा कणखर देशा बनवणारे ते मैदान. महाराष्ट्राची पावन माती तुमच्या उंबऱ्यात नेते ते मैदान.आज दिखाव्याच्या दुनियेत आपण हि मैदाने विसरलो तर नाहीये ना ? आम्हाला अपेक्षा आहे कि आपण विसरलो नसेनच. आजकाल मैदानावर पाल्यांपेक्षा पालक जास्त आहेत तेव्हा ते तरी आपल्या पोरं बाळांना ते विसरू देणार नाहीत अशी अपेक्षा आणि विनंती आम्ही करतो.
पुणेकरांनो, पत्र आटोपत घेत असताना आमची कोणाही विरोधात हि तक्रार नाही किंवा आमच्या पेक्षा बगीचे "ट्रेंड" मध्ये आहेत म्हणून आम्ही असुरक्षित आहोत असे हि नाही. कारण जोपर्यंत खेळ आहेत, उत्तमोत्तम खेळाडू आहेत तोपर्यंत आम्ही राहणार, आम्ही लढत राहणार, तुमची सेवा करत राहणार. कारण मित्रहो मैदाने हि फुलवायची नसतात जिंकायची असतात .
आम्हा सर्व मैदानाच्यावतीने आपणास विनंती करतो कि , सुशोभीकरणाच्या नावाखाली मैदानाची रग कमी होऊ देऊ नका. ती रग महाराष्ट्र आणि देश जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक आहे,
कळावे.
आपले,
जवळचे मैदान.
प्रेषक,
सर्व शहरांतील मैदाने.
मु.पो. दुर्लक्षितपूर
तालुका: काळजी नसावीगाव.
जिल्हा: रोजच्या गर्दीत.

Comments
Post a Comment