सोयाबीन ८०००-८५००/Qtl (८०-८५Rs/kg) सोयाबीन बियाणे १२०-१८०Rs./kg अचानक खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन मध्ये एवढी तेजी , बाजारामध्ये सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा, सोयाबीन सह सर्वच खाद्यतेलाच्या किमतींमध्ये ५०%हुन अधिक वाढ. हे अचानक एका महिन्यात झालेल्या बदलांमुळे सोयाबीन च्या पेरण्या आणि त्याच्याशी निगडित उद्योगधंदे प्रभावित झाले आहेत.
ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर असोसिएशन चे अध्यक्ष श्री. बहादूर अली यांनी केंद्रीय मंत्री पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय श्री गिरीराज सिंग यांना दिलेल्या पत्रामध्ये सोयाबीन च्या वाढत्या दरामुळे पोल्ट्री , दुभते पशुधन आणि डुक्करपालन अश्या व्यवसायांवर आलेल्या वाईट परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. . वाढते वाहतूक खर्च , महामारीचे सावट यामध्ये गेल्यावर्षी पोल्ट्री व्यवसायाला खूपच मार बसला होता. एक कोंबडी १०Rs च्या दरावर आली होती. आता काही प्रमाणात सुधारत असलेली परिस्थिती पुन्हा या सोयाबीन च्या दुप्पट झालेल्या दरांमुळे डबघाईला जात आहे. सोयाबीन हे पशुधन खाद्य मध्ये एक कॉमन आणि उत्त्तम प्रोटीन सोर्स आहे. त्याचे दर भारताबाहेर जवळपास निम्म्या किमतीवर आहेत. भारतात तयार झालेल्या पोकळ दरवाढी ला संतुलित करण्यासाठी सोयाबीन वरील आयात कर पुढील ५ महिने म्हणजे आपल्या सोयाबीन काढणी पर्यंत माफ करावेत. ज्याचा फायदा या पोकळ दरवाढीला फोडण्यासाठी होईल यामध्ये आपल्या शेतकऱ्यांनाहि वाढलेल्या बियाणे किमती पासून सुटका मिळेल.
सोयाबीन उत्पादनात भारत जगामध्ये पाचव्या क्रमांकावर येतो. अमेरिका , ब्राझील, अर्जेन्टिना , चीन यांच्यानंतर भारताचा नंबर लागतो. भारतातील एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दोनच राज्ये ९०% सोयाबीनचे उत्पादन करतात.
- सोयाबीन बियाणे दरवाढ (सप्लाय शॉर्टेज):
खरतर गेल्यावर्षी भारतामध्ये लावलेल्या अनुमानाएव्हडे सोयाबीन उत्पादन झाले होते. तरी हि सध्य परिस्थितीचा फायदा घेऊन काही मूठभर लोक बियाणे पुरवठ्याची कृत्रिम कमतरता बाजारामध्ये उभी करत आहेत. याचा सर्वात मोठा तोटा सर्वसामान्य शेतकऱ्याला होत आहे. बाजारातील काही लोभी वर्ग सोयाबीन चे बियाणे MRP पेक्षाही जास्त किमतीला विकत आहेत. सप्लाय शॉर्टेज चे नाव देऊन सरळ सरळ फसवणूक केली जाते आणि आपण शेतकरी त्याला घाबरून चढ्या किमतीमध्ये ते विकत घेतात. अश्या वेळी आपण हे विसरतो कि ब्लॅक ने घेतलेल्या तिकिटाचा फायदा त्या थेटर मालकाला आणि निर्मात्याला होतो आपल्याला फक्त क्षणिक आनंद मिळतो, खरेतर तोच आपला तोटाच असतो.
- सोया ऑइल आणि खाद्यतेले :
खाद्यतेलाच्या किमतींमध्ये गेल्या ११ वर्षातील सर्वाधिक वाढ झाली आहे ज्यामध्ये सोयाबीन ऑइल चा वाट दर्शनीय आहे. ज्याचा परिणाम पुन्हा माध्यम वर्ग, शेतकरी वर्गाच्या खिशावरच होतो आहे.
- पोल्ट्री / पशुधन उत्पादने दरवाढ:
अंडे, चिकन, दूध यांच्या किमतींमध्ये हळूहळू वाढ होत चालली आहे. सोयाबीनची पेंड वाढल्यामुळे हे बदल अपेक्षित आहेत. ह्या महामारी मध्ये अत्यावश्यक वस्तूंमध्ये येणाऱ्या घटकांचे दर वाढणार आणि हाल सामान्य जनतेचे होणार.
- भारतीय माध्यमे शेतीविषयक दुर्लक्ष :
भारतीय दृकश्राव्य माध्यमांनी बातम्यांमध्ये शेतीविषयक अश्या विषयांकडे दुर्लक्ष नेहमीच केले आहे. जोपर्यंत माध्यमे शेतीतील उपोषणे, सरकारी उपदेश, आत्महत्या, नुकसानीचे पंचनामे यापलीकडे जाऊन शेती विषय गोष्टींना खोल हात घालणार नाहीत तोपर्यंत शेतीला प्राईम टाइम कसा मिळणार.
शेतकरी म्हणून आपण अजूनही दरवाढ, अफवा अश्या प्रश्नांसोबत लढत आहोत. परंतु खरे प्रश्न सत्ताकर्त्यांना विचारलेच जात नाहीत. सोयाबीन च्या बाबतीत बोलाच झालं तर USA , ब्राझील यासारख्या देशांमध्ये सोयाबीनचे सरासरी उत्पादन ३-३.५ Qtl/हेक्टर आहे तर भारतात हेच उत्पादन १-१.३Qtl/हेक्टर एवढे कमी का ? अश्या कोणत्या गोष्टी त्या देशांकडे आहेत आणि आपल्याकडे नाहीत? शेतीप्रधान देश म्हणून मिरवताना शेतीसुशिक्षित व्हायचं विसरलो का आपण?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा