प्रति,
श्री.पुणेकर ट्रॅफिकवाले.
मु.पो.गाडीवर
तालुका-चालू गाडीवर
जिल्हा-हॉर्नपूर.
प्रिय पुणेकर,
नमस्कार, सादर प्रणाम !.मी लालबत्ती सिग्नलवाली. बऱ्याच दिवसांपासून तुमच्या सर्वांशी बोलायचं होत. आज मराठी राजभाषा दिनाच्या शुभ मुहूर्तावर पत्र लिहायला घेत आहे. जे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्यापर्यंत पोहचेल अशी अपेक्षा करते आणि मुख्य विषयाकडे वळते. पत्रास कारण कि , सततचा होणार अपमान आता मला सहन होत नाही. आपल्या पुण्याचा चौका चौकात मी दिवसभर भर उन्हात आपल्या सर्वासाठी जळत उभी असते परंतु माझ्या अस्तित्वाला नेहमी पुणेरी टोमणा मारल्या सारखे बरेचशे पुणेकर न जुमानता निघून जातात. माझी शेजारीण पिवळी बत्ती आपल्याला नेहमी माझ्या येण्याची आठवण करून देत असते आणि आपणास वेग कमी करण्यास सुचवत असते. परंतु आपण शेवटी पुणेकरच ना गाडीच्या भोंग्याचा आवाज वाढवत, मला धुडकावून लावत. आपण उलट अजूनच वेगाने निघून जाता. शेवटी माझ्या इज्जतीचे रक्षण करण्यासाठी उभे असलेले आमचे पोलीस बंधू पाहून तुम्ही कसे बसे थांबता. मी हे सर्व वरून पाहत असते. थांबल्यावर हि आपले वाहन बंद न करता भोंग्यावर हाताचे वजन वाढवून मला घाबरवत असतात. परंतु मी हि पुण्याची लालबत्ती आहे. मी माझी वेळ झाल्याशिवाय अजिबात हालत सुद्धा नाही.
मला एक गोष्ट अजूनही समजली नाही माझी वेळ संपत आली आहे हे माझ्या आधी तुम्हाला कसे काय समजते ? मी जाण्याआधीच आपली वाहने भरधाव माझा अपमान करून जात असतात. दुचाकी स्वार तर इतके सवती प्रमाणे वागवतात कि मी असो किंवा नसो त्यांना काही फरकच पडत नाही. एवढया ऊन वारा पावसाचा मार सहन करून आपल्या सुरक्षेसाठीच मी तिथे जळत असते. नव्या दमाच्या पोरांना तर माझे खूपच पित्त आहे. आजकालच्या भरधाव आणि कर्णकर्कश दुचाकी घेऊन ते असे भरधाव निघून जातात कि त्यांच्या साठी मी म्हणजे दुश्मनच झाली आहे. जरा सुद्धा भाव टाकत नाहीत. एखाद्या सुंदर मुलीने भाव टाकला तर दुचाकीचे वेग आपणहून कमी हातात. पण मी दिसले कि राखी दीदी दिसल्यासारखे पळत असतात. माझ्या इज्जतीची लक्ष्मण रेषा तर वाहनांच्या चाकांखाली अगदी पुसट होत चालली आहे. आता हे सर्व माझ्या सहनशीलतेची परीक्षा घेत आहेत. माझी सहकारी पिवळी बत्ती तर शेवटच्या घटक मोजत आहे.
पुणेकरांनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कृपया रोजची होणारी माझी मानहानी आता माझ्यालेखी सहन होत नाही. एक दिवस जर मी आले नाही तर तुमहाला तुमच्या कामावर वेळेत पोहचता येईल का ? एखाद्या रुग्णवाहिकेमध्ये असलेल्या रुग्णाला वेळेवर औषधोपचार मिळेल का ? शाळेत जाणाऱ्या मुलांना वेळेवर पोहचता येईल का ? भोंग्यांच्या वाढत्या कर्कशपणामुळे तुमचे कान सुरक्षित राहतील का ? एखाद्या वृद्ध आजी आजोबाना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असणाऱ्या आपल्या नातवाला भेटता येईल का? रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण तुमहाला रोखता येईल का? नव्या दमाच्या पोरांनो तुम्ही जिच्यासाठी एवढे भरधाव जात असता तिच्यापर्यंत सुखरूप पोहचाल का ? चौकात उभे असणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्याकडे त्यांची जयंती सोडून कधी लक्ष तरी जाईल का ? पुण्यात जो काही सावळा गोंधळ होऊन बसेल त्याचे उत्तर तुम्हाला मिळेल का ? याचा विचार करा. माझ्याकडे दुश्मनांच्या नजरेने न पाहता आपली मैत्रीण म्हणून बघा. मी तुमच्या सेवेसाठी आहे तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही.
शेवटी पत्र आटोपते घेताना, डोळ्यातील अश्रुना आवर घालत माझ्या इज्जतीचे दान माझ्या पदरात टाकण्यासाठी आपणा सर्वाना विनंती करते कि , माझ्या होणाऱ्या उपेक्षा बंद करा आणि मला हि समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी जेव्हा जेव्हा मी तुम्हाला चौकात मी दिसेन तेव्हा प्रेमाने वाहनाचा वेग कमी करून थोडं थांबा. त्या चौकाच्या सौंदर्याचा शांततेने आनंद घ्या मी तुम्हाला कायमच थाबवणार नाहीये परंतु जर माझ्यासाठी नाही थांबलात तर मात्र कदाचित तुम्हाला कायमचे थांबण्यापासून मी हि रोखू शकणार नाही.
कळावे . आपली लाल बत्ती सिग्नलवाली, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे. आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.
धन्यवाद.
प्रेषक,
लालबत्ती सिग्नलवाली.
हिरव्या बत्तीच्या विरुद्ध आणि पिवळ्या बत्ती शेजारी
मु.पो. प्रत्येक चौकात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा