प्रति, स्वच्छ पुणेकर, मु.पो- सुंदर पुणे ता.-निरोगी पुणे जि. स्वच्छ भारत प्रिय पुणेकर, कसे आहात ? स्वच्छतेचे धडे नीट गिरवताय ना ? हे धडे आपल्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत हि गिरवत आहे. जरी आज आम्ही पुणेकरांसाठी पत्र लिहीत असलो तरी ते पुणेकरांनी इतर सर्व शहरांना हि पोहोचवावे हि विनंती. विनंती पत्राच्या सुरवातीलाच करत आहोत कारण आमचा प्रश्न फक्त पुण्याला नाही तर तो सर्वांसाठीच आहे. तुम्हाला आमची कमतरता जाणवत असेल, आणि जिथे आम्ही उपस्थित असू हि तिथे आमची अवस्था बघून तुम्हालाही वाईट वाटत असेल. म्हणून आम्ही पुणे शहरातील सर्व सार्वजनिक प्रसाधन गृहे(मुताऱ्या) ,शौचालये एकत्र येऊन आपणास पत्र लिहीत आहोत. पत्रास कारण कि,असलेली आमची संख्या , असलेल्या कोणत्याही प्रसाधन गृहाचे झालेले हाल , तिथली स्वच्छता हि फारच दुय्यम दर्जाची होत चालली आहे. किंबहुना ती दुय्यमच राहिली आहे. तुम्ही फिरायला, कामाला किंवा अगदी सहजच जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुम्हाला कधी हि कोठेही "नैसर्गिक कॉल" येत असेलच त्यावेळी तुम्हाला आमची आठवण नक्की येत असेल. तुम्ही आमच्या शोधात सैर-भैर होऊन फिरता. नशिबाने आम्ह