मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वप्ने साजरी करा ....

मला असं वाटतंय .... मला, तुम्हाला आणि आपण सर्वाना खूप काही वाटत असतं . कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेता व्हायचंय,कोणाला नेता व्हायचंय , कोणाला कलाकार तर कोणाला उद्योजक व्हायचंय. हे वाटणं काही चुकीचं नाही. कारण काही तरी वाटल्याशिवाय काही तरी बनता पण येत नाही. सर्वच जण अपघाताने किंवा नशिबाने आयुष्याच्या उत्तुंग शिखरावर नक्कीच पोहचत नाहीत. काही तरी, कोणी तरी बनण्याची उर्मीच आपल्याला त्या शिखरापर्यंत घेऊन जात असते. मला वाटतं कि मी मुख्यमंत्री व्हावं , महाराष्ट्राचं भलं करावं , भ्रष्टाचार मोडून काढावा , राजकारण शुद्ध करावं , शहरांचा विकास करावा. पण हे वाटणं तुमच्या माझ्या सत्य परिस्थितीबद्दल काहीच बोलत नाही. जे बोललं जात ते भविष्याबद्दल , जे अजून घडायचं आहे. सोबतच हे वाटत असताना मी एक सामान्य नागरिक आहे, रोज महागतलं पेट्रोल डिझेल साठी रांगेत उभा असतो, निवडणुका आल्या कि रोजच्या जीवनातल्या अडचणी सोडून भलत्याच गोष्टींना बळी पडून , चार पैसे घेऊन , मान मोडलेला , स्वाभिमान मेलेला क्षुद्र मतदार आहे. ज्याला निवडणुकी नंतर काडीची किंमत नाही हे विसरून जातो. घर , गाडी चे हप्ते , टॅक्स चे हप्ते देऊन कं...