मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोयाबीन तापलंय

सोयाबीन ८०००-८५००/Qtl (८०-८५Rs/kg)  सोयाबीन बियाणे १२०-१८०Rs./kg अचानक खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन मध्ये एवढी तेजी , बाजारामध्ये सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा, सोयाबीन सह सर्वच खाद्यतेलाच्या किमतींमध्ये ५०%हुन अधिक वाढ. हे अचानक एका महिन्यात झालेल्या बदलांमुळे सोयाबीन च्या पेरण्या आणि त्याच्याशी निगडित उद्योगधंदे प्रभावित झाले आहेत.  ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर असोसिएशन चे अध्यक्ष श्री. बहादूर अली यांनी केंद्रीय मंत्री पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय श्री गिरीराज सिंग यांना दिलेल्या पत्रामध्ये  सोयाबीन च्या वाढत्या दरामुळे पोल्ट्री , दुभते पशुधन आणि डुक्करपालन अश्या व्यवसायांवर आलेल्या वाईट परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. . वाढते वाहतूक खर्च , महामारीचे सावट यामध्ये गेल्यावर्षी पोल्ट्री व्यवसायाला खूपच मार बसला होता. एक कोंबडी १०Rs च्या दरावर आली होती. आता काही प्रमाणात सुधारत असलेली परिस्थिती पुन्हा  या सोयाबीन च्या दुप्पट झालेल्या दरांमुळे डबघाईला जात आहे. सोयाबीन हे पशुधन खाद्य मध्ये एक कॉमन आणि उत्त्तम प्रोटीन सोर्स आहे. त्याचे दर भारताबाहेर जवळपास निम्म्या किमत...