अनेमिया - ५८.६% लहान मुले, ५३.२% गरोदर नसणाऱ्या महिला,५०.४% गरोदर महिला (२०१६ नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे) या पाहणी नुसार जगातील सर्वाधिक अनेमिया (Anemia) चे रुग्ण भारतात आढळतात. त्यातही महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ह्या आजारपणामुळे लहानमुलांमध्ये अशक्तपणा, वयस्क लोकांमध्ये अकार्यक्षमता आणि गरोदर महिलांच्या गर्भांमध्ये बाळाची बौद्धिक वाढ न होणे असे परिणाम दिसून येतात .
भारतामध्ये (इक्रिसॅट) ICRISAT इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिटयूट फॉर सेमी ऐरिड ट्रॉपिक्स हि संस्था आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पहिली जैविक खतांच्या साहाय्याने उत्पादित ज्वारी विकसित केली आहे. ज्यामध्ये लोह प्रमाण ५० ते ३०० टक्के पर्यंत वाढल्याचे आढळले आहे. ५ जुलै २०१९ ला ICSR14001 (परभणी शक्ती ) हे वाण सार्वजनिक करण्यात आले आहे. १०-१५% अधिक उत्पादन, आयर्न 45ppm (साधारण वाण 30ppm ) झिंक 32ppm (साधारण वाण 20ppm ), ४१ डिग्री तापमानासही सहनशील,प्रथिनांचे हि वाढीव प्रमाण आणि महत्वाचे म्हणजे बाजारातही वाढीव दर ही परभणी शक्तीची वैशिष्ट्ये. भारतामध्ये लोह(आयर्न) च्या कमतरतेमुळे होणाऱ्या Anemia (अनेमिया) सारख्या रोगांवर परभणी शक्तीच्या साहाय्याने विजय मिळवता येऊ शकतो.
ऑल इंडिया कोओर्डीनेटेड सौरघम (ज्वारी) इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट च्या अखत्यारीत चाचण्या घेऊन यशस्वी ठरलेली ज्वारीचे ICSR14001 हे वाण म्हणजे जणू एक वरदान ठरणार आहे. अवकाशात उपग्रह सोडणाऱ्या वैज्ञानिकाएवढेच तुल्यबळ काम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील वैज्ञानिकांनी केले आहे. उपलब्ध तृणधान्यांच्या वाणांमध्ये अश्या प्रकारे केली गेलेली किमयागारी अभिनंदनीय आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि भारतीयांच्या ताटामध्ये अशी ज्वारी लवकरात लवकर पोहचावी. शेतकऱ्याला हि ज्वारीचे वाढीव दर मिळण्यास मदत होईल.
Comments
Post a Comment