" कापूस " हा शब्द आणि पदार्थ बहुतेकांच्या जीवनात तेवढासा महत्वाचा नसेल. समईतील वात बनवण्यासाठी, कधी लागलं खुपलं तर , इंजेक्शन देताना वगैरे किंवा जखमेवर लावलेला , जुन्या उश्या गाद्यांमधून बाहेर आलेला कापूस. फार फार तर अत्तर लावून कानात कोंबून ठेवलेला आणि मयताच्या नाकात ठेवलेला कापूस . तो कापूस बनतो कुठे , कसा बनतो ह्यावर कधी आपण गांभीर्याने विचारच करत नाही. कापूस लागला तर तो घरात असतोच. एवढं काही महत्वाचा किंवा त्याच्या शिवाय घर चालू शकतच नाही अशी काही त्याची ख्याती अजून तरी नाही.तेव्हा थोडी कापसाची ओळख करून घेऊयात. इंग्रजांनी १५० वर्षे भारताला पिळून काढले त्यात सर्वात महत्वाचे कारण होते कापूस . फुटबॉल प्रेमींची ओळखीची नावे असणारे लिव्हरपूल , मँचेस्टर किंवा लँकेशायर हि शहरे ज्यावर उभी राहिली तो म्हणजे कापूस . जगात पहिली औद्योगिक क्रांती झाली त्याचा कच्चा माल म्हणजे कापूस . अमेरिकेत शेतातील मजूरकामासाठी आफ्रिकेतून काळ्यालोकांचा व्यापार चालू केला गेला त्याचे कारण कापूस . आज खनिज तेलाने जागतिक राजकारणात ज्याला हटवून आपले केंद्रस्थान बनविले आहे तो म्हणजे