Skip to main content

Posts

Showing posts from December, 2019

चिलीच्या किवी आणि भारत.

जगाच्या बाजारात चिली हा देश किवी उत्पादनात पहिल्या पाच देशांमध्ये येतो. चीन,इटली,न्यू झीलंड सारख्या देशानंतर चिलीचा क्रमांक लागतो.   भारतातील किवी फळाचा वाढता खप बघून चिली हा देश भारतामध्ये किवीच्या खपासाठी खास अभियान राबवणार आहे. ज्या मध्ये किवी फळाचे आरोग्यासाठी चे फायदे सांगितले जातील आणि लोकांमध्ये त्यासंबंधीची जन जागृती होईल. हे सर्व करताना चिली या देशाचे मुख्य उद्दिष्ट हे भारतामधील किवी निर्यात दुप्पट करणे हे आहे. आपल्या आरोग्याचे फायदे समजावून घेताना चिली देशातील शेतकऱ्यांचा होणारा फायदा त्यांना मिळणारे अधिकचे दर हे पाहणे विसरून चालणार नाही. चिली सारख्या छोट्याश्या देशाने अश्या प्रकारे त्यांचा देशातील शेतकऱ्यांसाठी कल्पक अभियान राबविणे हि बाब अभिनंदनीय आहे. भारतासारख्या फळ-फळावलीच्या देशामध्ये सीताफळ, रामफळ, हनुमानफळ,करवंदे,आंबट बोर,फणस  यांसारख्या अनेक फळांनी समृद्ध देशामध्ये येणाऱ्या कोणत्याही सरकारने द्राक्षे, संत्रे,आंबा यापलीकडे जाऊन भारतीय शेतकऱ्यांसाठी कोणत्याही देशामध्ये असे काही प्रकार केलेले नोंद कदाचित नसावीच. जर अश्या प्रकारे आपल्या मूळच्या फळांना योग्य मार्केट