सध्या चालू एक चित्रपट आहे. ज्या मध्ये मोठमोठे अभिनेते आहेत. काही तल्मितले तर काही मॅटवरचे आहेत, काही नवीन तर काही जबरदस्तीचे पन आहेत आणि काही, हे का आहेत ? असे हि आहेत. ह्या मध्ये खूप ड्रामे आहेत. अगदी वास्को द गामापर्यंतच्या कहाण्या आहेत, इतके टर्न आणि ट्विस्ट आहेत कि गामा पासून रामापर्यंतचे पुरावे आहेत. ह्या यामध्ये मनोमिलन, घरवापसी,फुटला, बोलला, गेला आणि हाणला सारखे इमोशन्स आहेत. कर्जमाफी, शेतकरी, स्थानिक उद्योगधंदे,छोटे उद्योजक, डिजिटल जनता अशी मेड इन इंडिया ट्रॅजेडी आहे. अक्शन सध्या सुरु आहे, त्यातून बाहेर पडलात कि हसवायला १ महिना सभांची कॉमेडी आहे. सेन्सॉरच तर बंधनच नाही. नुकत्याच जन्मलेल्या बाळा पासून ते नुकत्याच गेलेल्या जीव पर्यंत सर्वांना अनिवार्यच आहे. तोफांची नावं बदलतील, मैदाने तिच राहतील .कितीही देव बदलतील पण भोग तेच राहतील अशी गोष्ट आहे. नायक कोण अन खलनायक कोण हे त्यांनीच ठरवायचं आहे, कारण स्क्रिप्ट मध्ये नाक खुपसण्यास सक्त मनाई आहे. गाणे नसतील तरी घोषणा मन रमवून ठेवतील , स्वातंत्र्य दिन नसला तरी देशभक्तीचे गीत चालू असतील. प्रोड्युसर पडद्याम...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा